गणपती सणाला हातामध्ये घाला 'या' डिझाईनच्या राजेशाही बांगड्या
ड्रेस किंवा इतर कोणताही ट्रेडिशनल लुक केल्यानंतर तुम्ही या डिझाईनच्या सुंदर बांगड्या किंवा कडे घालू शकता. हे कडे ड्रेसवर सुद्धा अतिशय सुंदर दिसतात.
गुलाब तोडे, जाळीदार तोडे, पट्टेदार तोडे, रत्नजडीत तोडे, मोत्याचे तोडे इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तोडे बाजारात उपलब्ध आहेत.
काहींना जास्त बांगड्या परिधान करायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही आकाराने मोठा आणि नाजूक नक्षीकाम केलेला सुंदर कडा घालू शकता.
पारंपरिक तोड्यांना विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच महिला हातामध्ये बांगड्या घालतात. यामुळे हातांची शोभा वाढते आणि लुक सुंदर दिसतो.
पैठणी किंवा काठपदर साडी परिधान केल्यानंतर हिरव्या बांगड्याचा मध्ये तुम्ही या डिझाईनचे कडे घालू शकता. यामुळे हात अतिशय उठावदार दिसतील.