इरकलच्या पारंपरिक कापडाला द्या मॉडर्न टच! लग्नसोहळा- संसमारंभासाठी शिवा 'या' डिझाईनचे सुंदर ड्रेस
इरकलच्या कापडापासून रोजच्या वापरातील कुर्ता शिवून घेता येईल. रोजच्या वापरासाठी या डिझाईन अतिशय उत्तम पर्याय आहेत. यामुळे तुमचा लुक पारंपरिक आणि स्टायलिश दिसेल.
इतरांपेक्षा हटके आणि स्टायलिश लुक हवा असेल तर या डिझाईनस नक्की ट्राय करा. ड्रेसमध्ये तुमचा साधेपणा आणि पारंपरिकपणा जपणारा पोशाख दिसेल.
पारंपरिक इरकलच्या कापडामध्ये लहान मुलींसाठी सुद्धा ड्रेस, फ्रॉक किंवा इतर लेटेस्ट डिझाईन ड्रेस सुद्धा शिवता येईल.
योग्य नेकलाइन आणि स्लीव्ह्ज लुक दिल्यास ड्रेस किंवा अनारकली अतिशय आर्कषक दिसेल. इरकल कापडापासुन शिवलेले ड्रेस, फ्रॉक किंवा इतर लेटेस्ट डिझाईन कोणत्याही कार्यक्रमासाठी उत्तम आहेत.
इरकल साडीचा वापर करुन अनारकली ड्रेस शिवून घेऊ शकता. रंगीबेरंगी इरकल कापड कोणत्याही त्वचेच्या रंगावर उठावदार दिसेल. अनारकली ड्रेस शिवताना साडीची बाॅर्डर हातांना लावावी.