पुष्कर, राजस्थान: शाही विवाहाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुष्कर एक उत्तम ठिकाण आहे. अरवली पर्वतरांगांनी वेढलेले हे ऐतिहासिक शहर आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या पुरातन हवेल्या आणि राजवाड्यांमध्ये शाही विवाहाची अनुभूती तुम्हाला घेता येईल
अलिबाग, महाराष्ट्र: गोव्याच्या बजेटमध्ये विवाह शक्य नसल्यास, त्याच्या जवळच असलेले अलिबाग एक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारे आणि शहरी सोयी-सुविधांनी परिपूर्ण आहे. समुद्र किनारी स्वप्नवत लग्नासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे
मांडू, मध्य प्रदेश: भव्य किल्ले, राजवाडे आणि निसर्ग सौंदर्य असलेले मांडू हे ऐतिहासिक शहर डेस्टिनेशन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे
अलेप्पी, केरळ: रोमँटिक वातावरण आणि बॅकवॉटरसाठी ओळखले जाणारे अलेप्पी हे सुंदर ठिकाण आहे. हाऊसबोटीत विवाह सोहळा साजरा करण्याचा अनुभव खास असतो आणि नवदांपत्यांसाठी आयुष्यभर स्मरणीय राहील
जिम कॉर्बेट पार्क, उत्तराखंड: निसर्गाच्या सान्निध्यात शाही विवाह करायचा असल्यास, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क एक उत्तम निवड आहे. हिरवळ आणि शांत नद्या या ठिकाणाला मंत्रमुग्ध करतात