अभिनेत्री गायत्री दातारच्या हातावर श्रीकांत चौरेच्या नावाची मेहंदी रंगली आहे. गायत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर या खास सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत. गायत्री अगदी काहीच दिवसात बोहल्यावर चढणार आहे. दातारांच्या घरी कालच गायत्रीचे ग्रहमख झाले तसेच श्रीकांत चौरेच्या घरी मुहूर्तवेढाच्या विधीला संपन्न करण्यात आले. कपाळावर मुंडावळ्या आणि चेहऱ्यावर गोड हसू असा साज गायत्रीने केला होता.
गायत्री दातार आणि श्रीकांत चौरेचा मेहंदी सोहळा! (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री गायत्री दातारने तिच्या अधिकृत हँडलवर मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. गायत्रीच्या हातावर श्रीकांत चौरेच्या नावाची मेहंदी रंगली आहे.

या खास क्षणी गायत्रीने मेहंदी रंगाचा आऊटफिट परिधान केले आहेत तर श्रीकांतने मेहंदी रंगाचा जॅकेट परिधान केला आहे. त्यांचा लुक मेहंदीवाला आहे.

फोटोसाठी करण्यात आलेली सजावट मन मोहक आहे. फुलांनी संपूर्ण बाकडा सजवण्यात आला आहे जिथे उत्कृष्ट फोटोग्राफी करण्यात आला आहे.

गायत्रीने तिच्या आईसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. आईने तिला कुरवाळले आहे, फोटो अतिशय गोंडस आहे.

गायत्रीने कॅप्शनमध्ये 'Mehendi' असे छोटसे पण सुंदर कॅप्शन दिले आहे.






