अजित पवार विमान अपघातावरून सपकाळ आक्रमक; सुनील तटकरेंना सुनावलं
पुणे : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं आहे. निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी आहे आणि निवडणूक आयोगाची वकिली भलतेच लोक करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी डिलिमिटेशन, अजित पवार विमान अपघात प्रकरण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणावरही भाष्य केलं. (Harshwardhan Sapkal)
राजू शेट्टी यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्याच्या मुद्द्यावर बोलताना सपकाळ यांनी टोला लगावला. तुम्ही एकटे गेलात आणि निवडणूक आयुक्तांनी भेट दिली, हे तुमचं नशीब; मात्र आम्ही ३०० खासदार घेऊन गेलो तरी निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाकडून उत्तरं मिळत नसल्याने नागरिकांमधील अस्वस्थता वाढत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून रोहित पवार हे अनेक दिवसांपासून प्रश्न उपस्थित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मोठे विधान करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत तटकरेंवर निशाणा साधला आहे. ‘इतके दिवस झोपले होते का,’ असा सवाल करत त्यांनी तटकरेंना खडेबोल सुनावले आहेत.
Sanjay Shirsat : खासदारांचा भाव १५० कोटी? संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, संजय शिरसाटांचा थेट पलटवार!
डिलिमिटेशन विधेयकावर बोलताना भाजपला मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून देशात जातीय दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केला. इंडिया आघाडीतील पक्ष या विधेयकाला विरोध करत असून, याबाबत आघाडीच्या पातळीवर चर्चा होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर सपकाळ यांनी सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषयांवर भाष्य करणं योग्य नाही, असं सांगत त्यांनी या चर्चेवर अधिक बोलणं टाळलं.
एकूणच, सपकाळ यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील निवडणूक राजकारण आणि विरोधकांच्या भूमिकेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
Ans: निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी असून निवडणूक आयोगाकडून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, अशी टीका सपकाळ यांनी केली. ३०० खासदारांसह भेटायला गेल्यानंतरही निवडणूक आयुक्त भेटत नसल्याचा दावाही त्यांनी केला.
Ans: अजित पवार विमान अपघात प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेण्याच्या सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी 'इतके दिवस झोपले होते का?' असा सवाल केला.
Ans: हर्षवर्धन सपकाळ यांनी डिलिमिटेशन विधेयकाला विरोध दर्शवला आहे. इंडिया आघाडीतील पक्षही या विधेयकाला विरोध करत असून, याबाबत आघाडीच्या पातळीवर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.






