अनंत-राधिका यांच्या दोघांच्या लग्नाची चर्चा आणि त्यांचे साजरे होणारे मोठे सोहळे सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. आता नुकताच त्यांचा १२ जुलै रोजी लग्नसोहळा पार पडला आहे. या मध्ये मोठे अनेक बॉलीवूड, हॉलीवूड स्टार आणि तसेच उधोगपतीही सहभागी होते. तसेच या सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री जेनीलिया डिसुझा देखील सहभागी झाली होती. या लग्नसोहळ्यात जेनीलियाने मराठमोळा पोशाख परिधान केला होता.

अभिनेत्री जेनीलियाने अनंत-राधिकाच्या लग्नात मराठी साज परिधान केला होता, तिने सुंदर पांढऱ्या रंगाची हिमरु साडी या लग्नात घातली होती. ज्यामध्ये तिचे सौदंर्या खूप खुलून दिसत होते.

जेनीलियाने या पांढऱ्या हिमरु साडीवर नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर टिकली परिधान केली होती त्यामुळे ती अस्सल मराठी मुलगी वाटत होती. त्याच्या या लुकने सगळ्याच्या नजर तिच्या कडे खेळल्या होत्या.

जेनीलियाने स्वतः हे फोटो इंस्टाग्राम वर शेअर केले आहे, त्यामध्ये तिने लिहिले की, "संस्कार हा असा दागिना आहे जो वेगळा परिधान करावा लागत नाही पण तो दिसतो." असे तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमुळे जेनीलियाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

जेनीलियाने पांढऱ्या हिमरु साडीवरील लुक पूर्णकरण्यासाठी जाड आयलायनर, गुलाबी ब्लुश, मस्कारा आणि गुलाबी लिपस्टिक या सामग्रीचा वापर करून मेकअप केला आहे. तसेच यासह तिने गळ्यात मोत्यांचा हार आणि झुम्मके घातले आहेत.

या सगळ्यासह तिने केसात सुंदर मोगऱ्याचा गजरासुद्धा मळाला आहे. जेनीलियाने या पोशाखात खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहे.






