गुढी पाडवा सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. हिंदू नवीन वर्ष गुढीपाडवा सणापासून सुरु होते. मुंबईमध्ये मोठ्या उत्साहात गुढीपाडवा सण साजरा केला जातो. यादिवशी अनेक ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन सुद्धा केले जाते. मराठमोळी पारंपरिक नऊवारी साडी आणि त्यावर मोत्याचे दागिने घालून सुंदर लुक केला जातो. आजकाल बाजारात मोत्याच्या दागिन्यांचे अनेक सुंदर प्रकार उपलब्ध आहेत. पारंपरिक मोत्यांच्या माळा, कानातले, बांगड्या आणि अंगठ्या इत्यादी दागिने तुम्हाला हवे त्या डिझाईनमध्ये बनवून दिले जातात. त्यामुळे गुढीपाडवा सणाला तुम्ही हे मोत्याचे दागिने घालून सुंदर लुक करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
मोत्याच्या दागिन्यांचे सुंदर प्रकार! गुढी पाडव्यानिमित्त पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सची पहा खास झलक

बाजारात वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मोती मंगळसूत्र उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर पारंपरिक डिझाईनचे मंगळसूत्र हवे असतील तर ही डिझाईन उत्तम आहे.

नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर आवडीने मोत्याची नथ घातली जाते. नथीशिवाय मराठमोळा लुक अपूर्णच वाटतो. त्यामुळे नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यानंतर त्यावर मोत्याची नथ घालावी.

गुढीपाडव्याला अस्मिता जपणारे आणि सौंदर्यात भर घालणारा दागिने म्हणजे चिंचपेटी. चिंचपेटी तुम्ही कोणत्याही काठपदर किंवा पैठणी साडीवर घालू शकता.

फॅशनच्या युगात केवळ कपड्यांमध्येच नाहीतर दागिन्यांमध्ये सुद्धा अनेक बदल होताना दिसत आहे. मोत्याचे एअरकफ्स घातल्यानंतर कान पूर्णपणे भरगच्च दिसतील.

साडीवरील लुक पूर्ण करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घातल्या जातात. रंगीत बांगड्यांच्या मधोमध मोत्याच्या बांगड्या घातल्यास लुक मराठमोळा आणि पारंपरिक दिसेल.






