एकटे जाण्याचे धाडस करणे पडेल महागात! (फोटो सौजन्य - Social Media)
मार्वे-मड आयलँड रोड हा रास्ता शहरातील सर्वात सुंदर रस्त्यांपैकी एक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडे आणि मधून हा रस्ता दिवसा पाहायला सुंदर दिसतो पण जसजसा अंधार वाढतो. येथे प्रवास करणाऱ्या लोकांचे काळजाचे ठोके वाढतात. येथे नवरीच्या वेशात अदृश्य शक्तीचा वास असल्याचे बरेच किस्से प्रसिद्ध आहेत.
मुंबईपासून २०० किमी अंतरावर स्थित असलेला कशेडी घाट कोकणातील सगळ्यात भयंकर घाटांपैकी एक आहे. या वळणाच्या रस्त्यांमध्ये अनेकदा अदृश्य शक्तीच्या दिसण्याने अपघात होतात.
मुंबईपासून अगदी २ तासाच्या अंतरावर स्थित कसारा घाट म्हणजे अदृश्य शक्तीचे प्रसिद्ध निवासस्थान, असे लोकांचे म्हणणे आहे. येथून रात्रीचा एकटा प्रवास करणारा व्यक्ती अक्षरशः घामाने भिजून वाहन चालवतात.
मुंबईच्या मलबार हिल्स परिसरात स्थित असलेली ग्रँड पॅराडी नावाची इमारत शहरातील सगळ्यात प्रसिद्ध हॉरर स्पॉट म्हणून प्रचलित आहे. येथे आत्महत्यांचे अनेक प्रकरणे घडली आहेत.
वरील ठिकाणे तेथील काही चित्र विचित्र कथांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करून आहेत.