बदाम आणि अक्रोड खाण्याचे फायदे
ड्रायफ्रुटमध्ये अक्रोड आणि बदामामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही नियमित ५ ते ६ भिजवलेले बदाम आणि १ अक्रोड खाल्ल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
बदाम आणि अक्रोडाचे सेवन केल्यामुळे बुद्धी वाढण्यास मदत होते. तसेच मेंदूचे कार्य सुरळीत चालू राहून शरीरातील रक्तभिसरण सुधारते.
बदाम आणि अक्रोडचा वापर करून तुम्ही केक, स्मूदी, लाडू , खीर इत्यादी अनेक पदार्थ बनवू शकता. हे पदार्थ चवीला खूप सुंदर लागतात.
मैदानी खेळ खेळणाऱ्यानी रोजच्या आहारात काजू, बदाम, काळे मनुके, अक्रोड इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा कायम टीकून राहण्यास मदत होईल.
दैनंदिन जीवनात बदाम आणि अक्रोडचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन नैराश्यापासून सुटका मिळते. मनाला शांत करण्यासाठी तणाव पूर्ण जीवन जगण्यासाठी आहारात बदाम अक्रोडचे सेवन करावे.