जिऱ्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे
जिऱ्याचा पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन तुम्ही स्लिम दिसू लागता. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी सगळ्यात आधी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे.
जिऱ्यामध्ये इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. ताप किंवा सर्दी खोकला झाल्यानंतर जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे किंवा दुधामध्ये जिरं भिजवून दूध प्यावे.
शरीराची कमी झालेली भूक वाढवण्यासाठी जिरे प्रभावी आहे. जिऱ्याचे सेवन केल्यामुळे शरीराची भूक वाढण्यास मदत होते. जास्त भूक लागल्यानंतर वजन वाढू लागते आणि आरोग्याला फायदे होतात.
कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश करावा. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे अचानक तब्येत बिघडून जाते. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी जिरं खावं.
पोट दुखीची समस्या जाणवू लागल्यानंतर किंवा अपचन झाल्यानंतर जिऱ्याचे सेवन करावे. यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.