हिवाळ्यात द्राक्ष खाल्याने शरीराला होणारे फायदे
द्राक्षांमध्ये आढळून येणारे अँटिऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मदत करतात. शिवाय हृदयविकार, कर्करोग आणि मधुमेह इत्यादी आजारांची लागण होत नाही.
द्राक्षांमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे मधुमेह असलेले रुग्णसुद्धा द्राक्ष खाऊ शकता. या फळाच्या सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. आठवड्यातील पाच दिवस तुम्ही द्राक्षांचे सेवन करू शकता.
विटामिन ए युक्त द्राक्ष खाल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. दैनंदिन आहारात नियमित द्राक्ष खाल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होईल. मधुमेह असलेल्या रुग्णांनी लाल द्राक्षांचे सेवन करावे.
अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता जाणवू लागल्यास द्राक्षाचे सेवन करावे. बद्धकोष्ठता, पोटातील क्राम्पस, गॅस इत्यादी समस्यांपासून आराम मिळण्यास मदत होते.
द्राक्ष खाल्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यामध्ये आढळून येणारे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि वृद्धत्वापासून संरक्षण करतात.