हेल्दी फॅट्सचे आहारात करा सेवन
भोपळ्याच्या बियांचे वापर सॅलड किंवा पुडिंग बनवताना केला जातो. या बियांमध्ये जस्त आणि चांगले फॅट्स आढळून येतात. भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
रोजच्या आहारात कमीत कमी २ अंड्यांचे सेवन करावे. अंड्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. अंड्यात असलेल्या पिवळ्या बल्कमध्ये चांगले फॅट्स आढळून येतात.
ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त चिया सीड्स आरोग्यासाठी गुणकारी आहेत. वाढलेले वजन कमी करण्यासोबतच त्वचेचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी चिया सीड्स मदत करतात.
ऑलिव्ह तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळून येतात. जे हृदयासाठी अतिशय गुणकारी आहेत.
एवोकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. हे फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत., तसेच एवोकॅडो खाल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.