कॉन्ट्रास्ट साडीवर ब्लाऊजची निवड कशी करावी
कॉटन किंवा इतर फॅब्रिकमधील निळ्या आणि हिरव्या रंगाच्या साडीवर तुम्ही डार्क गुलाबी रंगाचा ब्लॉऊज निवडू शकता. हा रंग सर्व रंगाच्या त्वचेवर उठून दिसतो.
पांढरी किंवा सोनेरी रंगाची साडी नेसल्यानंतर तुम्ही त्यावर लाल, गुलाबी, निळा किंवा हिरव्या रंगाचा ब्लॉऊज घालू शकता. हे सर्व रंग इतरही साड्यांवर उठून दिसतात.
पिवळ्या रंगाची सिल्क साडी किंवा कॉटन साडी नेसल्यानंतर तुम्ही लाल किंवा गुलाबी रंगाचा ब्लॉऊज घालू शकता. हे कॅबिनेशन खूप सुंदर दिसते.
जांभळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लॉऊज परिधान करू शकता. हा रंग सगळ्यांवर उठावदार आणि आकर्षक दिसतो.
निळ्या रंगाच्या साडीवर गुलाबी किंवा लाल रंगाचा ब्लॉऊज खूप सुंदर दिसतो., हल्ली महिला साडीच्या काठाप्रमाणे किंवा साडीच्या आतील रंगानुसार ब्लॉऊज सिलेक्ट करतात.