हिवाळ्यात फक्त 5 रुपयांत घ्या ओठांची काळजी, लगेच मिळेल आराम
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ओठांवर तूप आणि खोबरेल तेल लावू शकता. याच्या मदतीने नैसर्गिकरित्या तुमचे ओठ मऊ होतीलतुपातील फॅटी ऍसिडस् ओठांची आर्द्रता टिकवून ठेवतात आणि खोबरेल तेलातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म ओठांचे पोषण करतात
एका अभ्यासानुसार, मधामध्ये असलेले अँटीमाइक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म ओठांचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात
फाटलेले ओठ टाळण्यासाठी, शरीरात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. त्यामुळे, पुरेसे पाणी प्या आणि आपले ओठ तसेच संपूर्ण शरीर हायड्रेटेड ठेवा
हिवाळा ऋतू सुरु झाला आहे त्यामुळे ओठांची विशेष काळजी घेत जा. यासाठी बाहेर पडण्यापूर्वी ओठांवर लिप बाम किंवा कोणतेही मॉइश्चरायझर लावायला विसरू नका
ओठ क्रॅक होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी, कच्चे दूध आणि मध्यापासून घरीच एक DIY क्रीम तयार करू शकता. ही क्रीम तुमच्या ओठांचे रक्षण करण्यास मदत करेल