
सापांच्या अधिवासातील छोट्या बदलांचा मोठा परिणाम! हाफकिन अभ्यासाला मिळाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
नीता परब: मुंबई स्थित हाफकिन संस्थेने केलेल्या एका वैज्ञानिक अभ्यासात असे आढळून आले आहे की विषारी सापांच्या अधिवासात थोडासा बदल केल्याने त्यांचे आरोग्य, वर्तन आणि एकूणच स्वास्थात चांगली सुधारणा होऊ शकते. हा निष्कर्ष केवळ विषारी सापांच्या चांगल्या काळजीशी संबंधित नाही तर या सुधारणेचा थेट परिणाम जीव वाचवणाऱ्या सर्पदंश प्रतिविष निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या सापांच्या विषाच्या सुरक्षितता व गुणवत्तेवर होतो.
हाफकीन सस्थेच्या वरीष्ठ शास्त्रज्ञ पुढाकार हाफकिन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मृणाल घाग सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये, भारतीय नाग,घोणस या सापांच्या निवास व्यवस्थेत अँस्पन लाकडाच्या भुसभुशीत काड्या आणि पारंपरिक कागदी बेडिंग यांची तुलना करण्यात आली.हा अभ्यास डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या विशाखापट्टणम येथे १३ व्या आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा प्राणी शास्त्रज्ञ संघटनेच्या परिषदेत सादर करण्यात आला. त्याबाबत विस्तृत व्याख्यान सादरीकरणासाठी तृतीय पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार या संशोधनाच्या वैज्ञानिक तसेच वक्तृत्वाला अधोरेखित करत आहे.
हा अभ्यास अधोरेखित करतो की वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेले छोटे बदल देखील प्राणी कल्याण, संशोधन नीतिमत्ता आणि मानवी आरोग्याच्या क्षेत्रात मोठे आणि अर्थपूर्ण परिणाम देऊ शकतात