'या' भाज्या वारंवार गरम केल्यास आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक
शिल्लक राहिलेली पालकची भाजी वारंवार गरम करून खाऊ नये. भाज्या गरम केल्यानंतर नायट्राइटमध्ये बदलतात. यामुळे मेथेमोग्लोबिनेमिया सारख्या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. रक्त वाहून नेण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या भाज्या सतत गरम करून खाल्ल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या आणि लहान मुलांमध्ये ब्लू-स्किन सिंड्रोम इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
मशरूम शरीरासाठी अतिशय पौष्टीक मानला जातो. पण मशरूमची भाजी सतत गरम करून खाल्ल्यास पोटात जडपणा, गॅस आणि उलट्या इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात.
बटाट्याची भाजी सतत गरम केल्यास टॉक्सिक कंपाऊंड्स तयार होतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते.त्यामुळे ज्या पदार्थांमध्ये बटाट्याचा वापर केला असेल त्या भाज्या सतत गरम करू नये.
Untitled design (41)