सकाळी उठल्यानंतर नियमित दोन केळी खाल्ल्यास आरोग्यासंबंधित समस्या होतील कायमच्या गायब
केळ्यांमध्ये असलेल्या नैसर्गिक साखर आणि फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय शरीराला लगेच ऊर्जा मिळते. कामानिमित्त कुठेही बाहेर जाताना नाश्त्यात केळी खाऊन जावे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही.
पचनसंस्था कायमच निरोगी राहण्यसाठी केळी खावीत. ऍसिडिटी किंवा अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर केळ्यांचा आहारात समावेश करावा. तसेच आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
केळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळून येते. यामुळे हृदयाचे आरोग्य कायमच निरोगी राहते. उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित २ केळी खावीत.
शरीरात निर्माण झालेल्या लोहाच्या कमतरतेमुळे अशक्तपणा किंवा थकवा वाढू लागतो. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी २ केळी खावी. यामुळे हिमोग्लोबिन वाढून आरोग्य सुधारेल.
वाढलेले वजन कमी करताना आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे आहारात नियमित केळी खावी. केळी खाल्ल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होत नाहीत.