वटपौर्णिमेला सुंदर आणि क्लासी लुक हवा असेल तर 'या' ट्रेंडिंग हेअर स्टाईल नक्की करा ट्राय
लांब केसांची हेअर स्टाईल करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. अशावेळी तुम्ही केसांची सुंदर वेणी घालून त्यावर रंगीत फुले किंवा ब्रोच लावू शकता. यामुळे तुमचा लुक क्लासी दिसेल.
काही महिलांना केस मोकळे ठेवायला खूप आवडतात. मोकळ्या केसांना तुम्ही मशीनद्वारे क्लस करून शकता. त्यावर तुम्ही गजरा किंवा डायमंड असलेला ब्रोच लावू शकता.
लांब केसांचा अंबाडा घालून त्यावर जप्सी किंवा गुलाबाच्या पाकळ्या लावून सुंदर हेअर स्टाईल करू शकता. गुलाबाच्या पाकळ्या केसांची शोभा वाढवतात.
हल्ली सर्वच महिला बनचा वापर करून हेअर स्टाईल करतात. केसांमध्ये बन घालून त्यावर मोगऱ्याचा किंवा चाफेच्या फुलांचा गजरा घातल्यास केस स्टयलिश दिसतील.
लहान केसांचा अंबाडा घघालण्यास खूप जास्त वेळ लागतो. अशावेळी अंबाडा किंवा कोणतीही हेअर स्टाईल न करता मोगऱ्याचा आडवा गजरा तुम्ही केसांमध्ये माळू शकता.