लग्नात रॉयल आणि हटके लुक हवा असेल तर ब्लाऊजवर करून घ्या सुंदर आरी वर्क डिझाइन्स
आरी वर्क ब्लाऊज शिवून घेतण्यासाठी खूप जास्त खर्च लागतो. त्यामुळे तुम्ही सोनेरी मण्यांचा वापर करून तुम्ही हातांना या पद्धतीने आरी वर्क करू शकता.
बाजारात ५०० रुपयांपासून ते अगदी १०००० रुपयांपर्यंत आरी वर्क करून मिळते. त्यामुळे तुम्ही बारीक डायमंड्सचा वापर करून साखरपुड्याची ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
हल्ली चेन स्टिटचा वापर करून बॉर्डर किंवा लहान पॅटर्न तयार केला जातो. यामुळे तुमचा ब्लाऊज खूप जास्त भरलेला आणि सुंदर दिसतो.
काहींना खूप जास्त साधा ब्लाऊज घालायला आवडतो. त्यामुळे तुम्ही ब्लाऊजच्या फक्त गळ्यावर किंवा बाहीच्या कडेला साधे, लहान बुटी किंवा बॉर्डर बनवून घेऊ शकता.
काहींना लग्नामध्ये अतिशय हेवी वर्क केलेला ब्लाऊज हवा असतो. अशावेळी तुम्ही संपूर्ण ब्लाऊजवर आरी वर्क करून घेऊ शकता.