केएल राहुलने एकाहून अधिक देशांमध्ये १००० पेक्षा जास्त धावा काढणाऱ्या भारतीयांच्या यादीत केला प्रवेश. फोटो सौजन्य – X
केएल राहुलने भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये १००० धावा पूर्ण करून या दिग्गज क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले. असे करणारा तो ७वा भारतीय ठरला आहे. राहुल व्यतिरिक्त, पॉली उम्रीगरने भारत आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. फोटो सौजन्य – X
या यादीत विराट कोहलीचेही नाव आहे. भारताव्यतिरिक्त, किंग कोहलीने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये १००० धावा केल्या आहेत. कोहलीने भारतीय क्रिकेटसाठी आंतरराष्ट्रिय स्तरावर देखील अनेक सामने जिंकवले आहेत. भारताच्या क्रिकेटमध्ये त्याची गणना दिग्गज खेळाडूमध्ये केली जाते. फोटो सौजन्य – X
त्याच्याशिवाय, तीन देशांमध्ये हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण आहे, ज्याने भारत, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये १००० कसोटी धावा केल्या आहेत. फोटो सौजन्य – X
सचिन तेंडुलकरच्या नावावर ५ देशांमध्ये १००० कसोटी धावा करण्याचा विक्रम आहे. तो या यादीत अव्वल स्थानावर आहे. भारताव्यतिरिक्त, मास्टर ब्लास्टरने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत ही कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य – X
या यादीत सुनील गावस्कर सचिन तेंडुलकरच्या मागे आहेत कारण त्यांनी त्यांच्या कसोटी कारकिर्दीत ४ देशांमध्ये १००० कसोटी धावा केल्या. भारताव्यतिरिक्त, लिटिल मास्टरने इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये ही कामगिरी केली. भारतानंतर, गावस्करकडे धावा काढण्यात जर आवडता देश असेल तर तो वेस्ट इंडिज आहे. फोटो सौजन्य – X