या देशात भारतीयांना केवळ 20 रुपयांत मिळतो प्रवेश; इथे ना व्हिसाची गरज ना पासपोर्टची...
आम्ही ज्या देशाविषयी बोलत आहोत तो देश म्हणजे म्यानमार. इथे तुम्ही इमिग्रेशन पावतीवर संपूर्ण देश फिरू शकता
भारत आणि म्यानमार या दोन देशांमधली सीमा सकाळी 6.30 ते संध्याकाळी 4.30 या वेळात चालत ओलांडायला खुली असते. या वेळेनंतर मात्र ही सीमा ओलांडता येत नाही
म्यानमारमधील काही लोकप्रिय स्थळांविषयी बोलणे केले तर श्वेडागॉन पॅगोडा, बागान मंदिरे, नगपाली बीच, इनले लेक, म्यानमारचे राष्ट्रीय संग्रहालय, फाउंग डाव ओ पॅगोडा अशी त्यांची नावे आहेत
मणिपूर राज्याची राजधानी इंफाळ या गावापासून रस्ते मार्गाने 3 तास प्रवास केला की 107 किलोमीटर अंतरावर मोरेह गाव लागते, जे भारतातले शेवटचे गाव आहे. हे गाव भारत-म्यानमारच्या सीमेवर वसलेले आहे
म्यानमारमध्ये तुम्ही अनेक मंदिरं, स्मारकं, समुद्रकिनारे, गुहा आणि पर्वतांचा आनंद लुटू शकता. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय सीमेवरून इथे चालून जाता येते