भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताचा संघ आजपासून म्हणजेच ८ नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T२० मालिका खेळणार आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये चार सामान्यांची T२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने शेवटचा T२० सामना भारताविरुद्ध T२० विश्वचषक २०२४ मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात खेळला होता या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून टीम इंडिया विश्वविजेती झाली होती. आज पुन्हा टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढणार आहे, यासाठी टीम इंडिया मैदानात घाम गाळत आहे त्याच्या फोटोंवर एकदा नजर टाका.
ज पुन्हा टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढणार आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताच्या संघाने शेवटचा सामान T२० विश्वचषक २०२४ फायनलमध्ये खेळला होता. यावेळी भारताचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले होते आता भारताच्या T२० संघाची कमान सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
२०२४ विश्वचषकमधील स्टार अर्शदीप सिंहला संघामध्ये स्थान मिळाले आहे आता तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कशी कामगिरी करेल आणि भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोई यांच्या कामगिरीकडे नजर असेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारतीय संघामध्ये नवा चेहरा पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच रमनदीप सिंहचा. तो त्याच्या पहिल्या सामन्यांमध्ये कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारतीय संघाचा फलंदाज अभिषेक शर्माकडे चाहत्यांच्या नजरा असणार आहे, त्याच्याबरोबर टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंह सुद्धा आज मैदानामध्ये दिसणार आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारतीय संघाचा फलंदाज संजू सॅमसनवर भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे, त्याने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात कमालीची कामगिरी करून दाखवली होती. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे युवा टीम इंडियासमोर मोठे आव्हान असणार आहे. फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया