खोकला झाल्यानंतर लहान मुलांना कफ सिरप देण्याऐवजी करून पहा 'हे' आयुर्वेदिक उपाय
कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी काळीमिरी, बदाम आणि साखर मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्या. तयार केलेली पावडर मधात किंवा दुधात मिक्स करून प्यायल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.
सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी दालचिनीचा काढा प्यावा. काढा बनवताना त्यात दालचिनी, वेलची, आले आणि लवंग पाण्यात व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर बारीक तुकडा गूळ टाकून सेवन केल्यास सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून सुटका मिळेल.
शरीरासाठी मेथी दाणे अतिशय प्रभावी मानले जातात. रात्री झोपण्याआधी एक ग्लास पाण्यात मेथी दाणे भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून भिजलेल्या मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास खोकला कमी होण्यास मदत होईल.
किसलेल्या आल्याचा रस काढून मधात मिक्स करून प्यायल्यास सर्दी, खोकला आणि साथीच्या आजारांपासून शरीराचे अजिबात नुकसान होणार नाही.
भाजलेली लवंग खाल्ल्यास खोकला कमी होईल. यासाठी तवा गरम करून त्यावर लवंग भाजून घ्या. त्यानंतर भाजलेली लवंग चघळून खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतील.