तुमच्याही स्मार्टफोनमध्ये दिसत आहेत ही लक्षणं? कोणी स्क्रीन रिकॉर्डिंग तर करत नाही ना? या सोप्या टिप्सनी ओळखा
जर तुमच्या फोनची स्क्रीन रेकॉर्ड होत असेल, तर तुम्हाला फोनवर ग्रीन लाइट दिसेल. कॅमेरा, रेकॉर्डिंग किंवा माइक सक्रिय असताना ग्रीन लाइट दिसते.
जर तुम्च्या स्मार्टफोनचा कॅमेरा चालू असेल तर ग्रीन लाईटच्या बाजूला तुम्हाला कॅमेऱ्याचे चिन्ह दिसेल
जर तुमच्या स्मार्टफोनचा माईक चालू असेल तर ग्रीन लाईटच्या बाजूला तुम्हाला माईकचे चिन्ह दिसेल
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा रेकॉर्डिंग होत असेल तर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला रेड लाईट दिसणार आहे
अनेक मालवेअर आणि स्पायवेअर तुमच्या परवानगीशिवाय फोन स्क्रीन रेकॉर्ड करतात आणि तुमचा डेटा चोरतात
कोणत्या अॅप्सना स्क्रीन रेकॉर्ड करण्याची परवानगी आहे हे तुम्ही परवानगी सेटिंग्जमधून तपासू शकता