भारतातील सर्वात भयानक रेल्वे स्टेशन! खंडर झालीये जागा जिथे आजही कुणी फिरकत नाही; रेल्वे मार्गावरच घातलीये बंदी
धनबाद जिल्ह्यातील झरिया येथील रेल्वे स्टेशन आता उध्दवस्त झाले असून याला देशातील सर्वात भयानक आणि झपाटलेले रेल्वे स्थानक मानले जाते. पूर्वी हे रेल्वे स्थानक गर्दीने भरलेले असायचे पण आता हे स्टेशन खंडर बनले असून इथे दिवसाही शांतता पाहायला मिळते.
स्थानिकांच्या मते, रात्र होताच इथे घुंगरांचे विचित्र आवाज ऐकू येतात. काही लोकांना तर इथे रडण्याचा कर्कश आवाज ऐकू आला आहे. या सर्वच कथांमुळे इथे कुणीही फिरकायची चूक करत नाही, विशेषत: ७:३० नंतर तर तुम्हाला इथे साधा पाखरुही दिसणार नाही
२००२ साली झरिया रेल्वे मार्गावर बंदी घालण्यात आली ज्यानंतर हे ठिकाण निर्जन झाले. आधी इथे अनेक गाड्या थांबत होत्या परंतु आता इथल्या एका लहान केबिनमध्ये दुपीरी ४ पर्यंत तिकीटे दिली जातात ज्यानंतर हे स्टेशन निर्जन बनते
भारतीय रेल्वेने या स्थानकाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, ज्यामुळे ते उद्धवस्त झाले आहे. देखभालीचा अभाव आणि कथित भयावह कथांमुळे स्थानिक या स्टेशनच्या आजूबाजूलाही जायला घाबरतात
सूर्य मावळायला लागताच इथे एक भयाण शांतता पसरते आणि कुणीही या ठिकाणाकडे जाण्याचे धाडस करत नाही. आता रेल्वे स्थानकाबाबत केले जाणारे हे दावे लोकांचा गैरसमज आहे की खरोखरच इथे अज्ञात शक्तीचा वास आहे हे गूढ अजून गुलदस्त्यात आहे