Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune–Prayagraj Special Trains: पुणे ते प्रयागराज दोन विशेष गाड्या धावणार; २७ व ३१ डिसेंबरला सुटणार

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भाड्यात भारतीय रेल्वेने किरकोळ वाढ केली आहे. २१५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी सामान्य वर्गात प्रवास केल्यास आता प्रति किलोमीटर १ पैशाची अतिरिक्त आकारणी होणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 24, 2025 | 05:25 PM
special train, Central Railway Pune division,

special train, Central Railway Pune division,

Follow Us
Close
Follow Us:
  • हिवाळी गर्दी लक्षात घेता पुणे–प्रयागराज एकमार्गी विशेष गाड्या
  • पुणे ते प्रयागराज दोन विशेष गाड्या धावणार; २७ व ३१ डिसेंबरला सुटणार
  • रेल्वे प्रवाशांना किरकोळ भाडेवाढ, लांब पल्ल्याच्या प्रवासावर परिणाम
Pune Railway Latest News: हिवाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष शुल्कावर पुणे ते प्रयागराज दरम्यान दोन एकमार्गी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१४११ पुणे प्रयागराज एकमार्गी विशेष गाडी दि.२७ डिसेंबरला आणि गाडी क्रमांक ०१४९९ ही ३१ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथून सुटणार आहे.असे मध्य रेल्वे पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Mumbai Monorail News: मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली! आचारसंहितेमुळे मोनोरेलच्या निविदा प्रक्रियेला ब्रेक

गाडी क्रमांक ०१४११ पुणे – प्रयागराज एकमार्गी विशेष गाडी शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी पुणे येथून सायं ७.५५ वाजता सुटेल. आणि दोन दिवसानंतर दुपारी वाजता प्रयागराज येथे पोहोचेल.तर गाडी क्रमांक ०१४९९ पुणे– प्रयागराज एकमार्गी विशेष गाडी ही बुधवार, ३१ डिसेंबर रोजी पुणे येथून सायं ७.५५ वाजता सुटेल आणि दोन दिवसानंतर दुपारी दोन वाजता प्रयागराज येथे पोहोचणार आहे. या गाडीचे थांबे हे हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी व फतेहपूर येथे असणार आहेत.

आरक्षण व तिकीट व्यवस्था

गाडी क्रमांक ०१४११ व ०१४९९ या गाडीच्या आरक्षित स्लीपर श्रेणीसाठी आरक्षण २५ डिसेंबर २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर तसेच आयआरसीटीसीच्या www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा व त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.

रेल्वे प्रवाशांना किरकोळ भाडेवाढ; लांब पल्ल्याच्या प्रवासावर परिणाम

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भाड्यात भारतीय रेल्वेने किरकोळ वाढ केली आहे. २१५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी सामान्य वर्गात प्रवास केल्यास आता प्रति किलोमीटर १ पैशाची अतिरिक्त आकारणी होणार आहे. तसेच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या नॉन-एसी कोचसह सर्व एसी वर्गांमध्ये प्रति किलोमीटर २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेने दिलेल्या उदाहरणानुसार, ५०० किलोमीटर अंतराच्या नॉन-एसी प्रवासासाठी प्रवाशांना केवळ अतिरिक्त १० रुपये अधिक मोजावे लागतील. त्यामुळे ही भाडेवाढ अत्यल्प असल्याचे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

India Sri-Lanka Ties : शेजारधर्म! जयशंकर दौऱ्यावर, संकटकाळात भारतच मदतीला येतो; श्रीलंकेला 45 कोटी

भाडेवाढीतून कोणाला सूट?

नवीन भाडे प्रणालीअंतर्गत उपनगरीय लोकल गाड्या आणि मासिक हंगामी तिकिटे (MST) यांच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच सामान्य वर्गात २१५ किलोमीटरपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जुनेच भाडे लागू राहणार आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी रेल्वेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपनगरीय सेवांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

भाडेवाढ का करण्यात आली?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या दशकात रेल्वे नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. कामकाजाचा व्याप वाढला असून, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या आहेत. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून त्यामुळे खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या रेल्वेचा कर्मचाऱ्यांवरील खर्च ₹१.१५ लाख कोटींवर पोहोचला आहे, तर पेन्शनवरील खर्च सुमारे ₹६०,००० कोटी रुपये आहे. २०२४–२५ या आर्थिक वर्षासाठी रेल्वेचा एकूण परिचालन खर्च ₹२.६३ लाख कोटींवर गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Puneprayagraj special trains on december 27 and 31 central railway announces puneprayagraj one way special trains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Indian Railway
  • Marathi News
  • Railway News

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांमध्ये WWE! वाराणसी-लखनऊ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये गोंधळ, अमेठीजवळील Video Viral
1

रेल्वे प्रवाशांमध्ये WWE! वाराणसी-लखनऊ इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये गोंधळ, अमेठीजवळील Video Viral

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न
2

रायगड मिलिटरी स्कूलमध्ये जिल्हास्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा २०२५–२६ यशस्वीरित्या संपन्न

Supreme Court judgment : मृत्युपत्रावर आधारित नामांतरण अर्ज सुरुवातीलाच फेटाळता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
3

Supreme Court judgment : मृत्युपत्रावर आधारित नामांतरण अर्ज सुरुवातीलाच फेटाळता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल
4

CobraPost investigation: ५ वर्षांत २५ हजार कोटी रोख व्यवहार; १४ बँकांचा उल्लेख, कोबरापोस्टचा खळबळजनक अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.