Cleanest Cities: ही आहेत भारतातील सर्वात स्वच्छ शहरं, तुमच्या शहराचा समावेश आहे का?
भारतातील पाच स्वच्छ शहरांमध्ये मध्य प्रदेशातील दोन शहरांचा समावेश होतो. तसेच या यादीत महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश आहे.
इंदौर- इंदौर हे शहर स्वच्छतेत पहिल्या क्रमांकावर आहे. इंदौरला मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी देखील म्हटले जाते. या शहरातील पोहे इंदोरी पोहे या नावाने देशभर प्रसिद्ध आहेत. घरोघरी जाऊन कचरा उचलणे, घरोघरी स्वच्छतागृह अभियान, कचराकुंड्या हटवणे आदी उपक्रम या ठिकाणी राबवले जातात.
सुरत - गुजरातमधील सुरत शहर स्वच्छतेच्या बाबतीतही अव्वल आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2023 च्या अहवालानुसार, इंदौरसह, सुरतचा देखील भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीत समावेश आहे. सुरत शहराला सिल्क सिटी देखील म्हणतात, या शहरात सुती आणि रेशमी कपडे आढळतात.
नवी मुंबई - नवी मुंबई हे भारतातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक आहे. स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर येते. नवी मुंबई सुमारे 163 चौरस किमी परिसरात पसरलेली आहे.
विशाखापट्टणम - आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम हे भारतातील चौथे स्वच्छ शहर आहे. हे शहर देशातील सर्वात जुन्या बंदर शहरांपैकी एक आहे. विशाखापट्टणम त्याच्या सुंदर आणि शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी देखील ओळखले जाते.
भोपाळ - हे भारतातील पाचवे स्वच्छ शहर आहे. भोपाळला तलावांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. या शहरात बिर्ला मंदिर, जामा मशीद, शौकत महल, भारत भवन अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत.