Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Election : नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 27, 2025 | 06:35 PM
Navi Mumbai Election : नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार
Follow Us
Close
Follow Us:
  •  नवी मुंबईत आढळले 13,336 दुबार मतदार
  • दुबार मतदारांची यादी पडताळणीसाठी देण्यात आली
सिद्धेश प्रधान/नवी मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी दि. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. यामध्ये आयोगामार्फत दिलेल्या 45 हजार 588 संभाव्य दुबार मतदारांच्या यादीची बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली असून त्यामध्ये 13 हजार 336 दुबार मतदार आढळून आले आहेत. त्यांच्याकडून ते कोणत्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावावर मतदान करणार याचे विकल्प स्वरुपातील हमीपत्र भरुन घेण्यात आले आहे.

महापालिका क्षेत्रात राज्य निवडणूक आयोग यांच्या वतीने प्राप्त दुबार मतदारांच्या यादीनुसार तपासणी करण्यासाठी प्रभागनिहाय बीएलओ यांची पथके स्थापन करण्यात आली होती. दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार संगणक प्रणालीव्दारे दुबार मतदारांच्या नावानुसार व विधानसभा यादी भागाप्रमाणे मतदार यादीचे वर्गीकरण करण्यात आले व छायाचित्रे असलेली दुबार मतदारांची यादी बीएलओ यांच्याकडे पडताळणीसाठी देण्यात आली होती.

BMC Election मध्ये डॉन अरुण गवळी यांची एन्ट्री, दोन्ही मुलींनी दाखल केला अर्ज, कोण कुठून निवडणूक लढवणार? जाणून घ्या सविस्तर

बीएलओ मार्फत मतदार यादीतील या संभाव्य दुबार नावांचा शोध घेऊन, फोटो पडताळणी करुन, ही नावे काणत्या प्रभागात आहेत, छायाचित्रात साम्य आहे काय, आई वडीलांच्या नावात साम्य आहे काय, पत्ता सारखा आहे काय – अशा विविध प्रकारे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकाच व्यक्तीचे नाव दोन पत्त्यांवर आढळल्यास अशी दुबार नाव असलेली व्यक्ती त्यापैकी कुठल्या पत्त्यावर असलेल्या नावांवर मतदान करेल याबाबत विकल्प अर्थात हमी पत्र भरुन घेण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने  राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या संभाव्य दुबार मतदारांची पडताळणी नियोजनबध्दरित्या केली आहे.

Railway News: रेल्वेचे जाळे विस्तारणार! 400 किमीचे नवीन रेल्वे नेटवर्क, उपनगरीय मार्गावर तीन हजार फेऱ्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी कोणती मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे?

    Ans: राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे दि. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे.

  • Que: संभाव्य दुबार मतदारांची संख्या किती होती?

    Ans: राज्य निवडणूक आयोगामार्फत 45,588 संभाव्य दुबार मतदारांची यादी महापालिकेला देण्यात आली होती.

  • Que: प्रत्यक्ष पडताळणीत किती दुबार मतदार आढळले?

    Ans: बीएलओ (Booth Level Officer) मार्फत केलेल्या प्रत्यक्ष पडताळणीत 13,336 दुबार मतदार आढळून आले.

Web Title: Navi mumbai election 13336 duplicate voters found in navi mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…,  मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या
1

मायलेकीच्या नात्याला काळीमा! 6 वर्षांच्या मुलीचे नाक आणि तोंड दाबून…, मुलगी नको म्हणून आईकडूनच पोटच्या गोळ्याची हत्या

शासन निर्णय धाब्यावर? नवी मुंबईत नाताळच्या रात्री क्लब चालकांना पोलिसांकडून नाहक त्रास; आयुक्तांकडे दाद मागण्याची वेळ
2

शासन निर्णय धाब्यावर? नवी मुंबईत नाताळच्या रात्री क्लब चालकांना पोलिसांकडून नाहक त्रास; आयुक्तांकडे दाद मागण्याची वेळ

या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ
3

या संस्थानिकांचे करायचे काय? स्वतःच्या निवडणुकीला धावपळ, नेत्यांसाठी मात्र मरगळ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘सुवर्ण उड्डाण’! २५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी ३० विमानांची ये-जा
4

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘सुवर्ण उड्डाण’! २५ डिसेंबरपासून विमानसेवा सुरू; पहिल्याच दिवशी ३० विमानांची ये-जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.