काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही...
शास्त्रज्ञांच्या मते, विश्वाचा सुमारे २५% भाग हा अंधारमय पदार्थांनी बनलेला आहे आणि याचा ७०% भाग अंधारमय उर्जेने बनलेला आहे तर उरलेला ५% भाग हा सामान्य पदार्थ आणि प्रकाशाने बनलेला आहे, जे आपल्याला पाहता येत नाही
डार्क मॅटर हा रहस्यमय पदार्थ आहे, जो थेट पाहता येत नाही, त्याला फक्त त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून शोधले जाते. ते आकाशगंगेला एका ग्लूप्रमाणे जोडण्याचे काम करते.
डार्क एनर्जी ही एक अशी स्थती आहे जी विश्वाचा वेगाने विस्तार करते. यामुळे विश्वाचा सातत्याने विस्तार होत राहतो आणि दूरच्या आकाशगंगा आपल्या डोळ्यांपासून दूर होत चालल्या आहेत
डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी कोणत्या कणांपासून बनवण्यात आले आहेत हे शास्त्रज्ञांना अजूनही समजू शकलं नाही. हे विश्वातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक आहे. याचा अभ्यास केल्यास आपल्याला विश्वाची उत्पत्ती आणि उत्क्रांती हे समजण्यास मदत होऊ शकते
आता तारे असूनही ब्रह्मांडात प्रकाश का नाही या प्रश्नाच उत्तर द्यायचं झालं कर याचं मूळ कारण म्हणजे, बहुतांश तारे हे आपल्या दृष्टीपासून फार दूर आहेत आणि त्यांचा प्रकाश पृथ्वीवर कमकुवत स्वरुपात पोहचतो. याशिवाय अवकाशातील वायू आणि धूळ प्रकाशाला अडथळा निर्माण करतात ज्यामुळे ब्रह्मांडाचा बहुतेक भाग अंधारमय दिसतो