बांग्लादेशबद्दल तुम्हाला काही विशेष गोष्टी माहीत आहेत का? चला तर आपण जाणून घेऊया या महत्त्वाच्या आणि खास गोष्टी
बांगलादेशने 26 मार्च 1971 रोजी आपले स्वातंत्र्य घोषित केले. 16 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले असले तरी बांगलादेशची राज्यघटना 4 नोव्हेंबर 1972 रोजी लागू करण्यात आली होती
बाग्लांदेशाचे राष्ट्रगीत ‘अमर सोनार बांग्ला’असून हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांनी लिहलेले आहे
बांगलादेशात एक व्यक्ती दोन वेळाच राष्ट्रपती पदावर राहू शकते असा नियम आहे. तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका दर ५ वर्षातून एकदा होतात
बांगलादेशचे खरे नाव पीपल्स रिपब्लिक ऑफ बांग्लादेश आहे असे आहे
याशिवाय बांगलादेशचे राष्ट्रीय फळ फणस आहे आणि राष्ट्रीय झाड आंब्याचे झाड आहे. तर राष्ट्रीय फूल लिली आणि राष्ट्रीय प्राणी रॉयल बंगाल टायगर आहे
तसेच कबड्डी हा बांग्लादेशाचा राष्ट्रीय खेळ आहे. तसेच बांगलादेशकडे स्वतःचा क्रिकेट संघ देखील आहे
बांगलादेश हा लोकसंख्येच्या आधारावर जगातील आठव्या क्रमांकाचा देश आहे. येथे प्रति चौरस किलोमीटर सरासरी 3000 लोकसंख्या आहे. तसेच बाग्लांदेशतील सगळ्यात मोठे शहर ढाका असून ते जगातील सर्वात जास्त लोकंसंख्येच्या दृष्टीने 10 व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे
जगातील सर्वात मोठा सागरी किनारा बांगलादेशात आहे. येथील कॉक्स बाजार बीच हा जगातील सर्वात मोठा समुद्रकिनारा असल्याचे म्हटले जाते
बांग्लादेश हे जगातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल आहे. तसेच बांगलादेशातून अंदाजे 700 नद्या वाहतात