Mohammad Yunus makes serious allegations against India
India Bangladesh Relations : ढाका : बांगलादेशचे अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस (Muhammd Yunus) यांनी भारताबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारत आणि बांगलादेश संबंध पुन्हा ताणले जाण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्कमध्ये एका मुलाखतीदरम्यान युनूस यांनी भारतावर टीका करत म्हटले की, ऑगस्ट २०२४ मध्ये बांगलादेशात झालेल्या विद्यार्था आंदोलनाला भारताने विरोध केला, यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
शिवाय युनूस यांनी भारतावर असाही आरोप केला आहे की, शेख हसीना यांना दिल्लीने देशात आश्रय दिल्यामुळेच बारत आणि बांगलादेशचे संबंध तणावपूर्ण झाले आहेत. तसेच भारतीय माध्यमांवरही युनूस यांनी आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतीय माध्यमांनी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलाना इस्लामिक कट्टरवादाशी जोडून खोटे चित्र जगासमोर उभे केले आहे. त्यांना आम्हाला तालिबानसारखे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे भारतविरोधी द्वेष पसरवला जात असल्याचे दिसून येते आहे.
भारताच्या ईशान्येकडील राज्यावरही टीका
याशिवाय युनूस यांनी पुन्हा एकदा भारताच्या ईशान्येकडील टीका केली आहे. त्यांनी भारताच्या सात ईशान्य राज्यांना समुद्रमार्ग नाही, तर बांगलादेशने त्यांना मार्ग उपलब्ध करुन दिला आहे. या विधानाने भारताच्या सार्वभौमत्त्वाला पुन्हा एकदा धोका निर्माण झाला आहे.
याशिवाय बांगलादेशने दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (SAARC) पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ही संघटना भारतामुळे निष्क्रिय झाली होती, असा आरोप केला आहे. युनूस यांच्या या भूमिकेतून पाकिस्तानी भाषा स्पष्टपणे दिसून येत आहे.
Bangladesh’s Yunus in New York ‘…We have problems with India right now, bcz they didn’t like what the students have done..’ ‘India is hosting Hasina who has created problems..that creates tension between India, Bangladesh’ pic.twitter.com/F4y9wR8i74 — Sidhant Sibal (@sidhant) September 25, 2025
मोहम्मद युनूस यांच्या भारतावरील गंभीर आरोपांमुळे भारत आणि बांगलादेश (Bangladesh) संबंधात आणखी कटुता वाढण्यची शक्यता आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये संवादाऐवजी अविश्वासाची दरी वाढण्याची शक्यता अधिक आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
मोहम्मद युनूस यांनी भारतावर कोणते आरोप केले ?
मोहम्मद युनूस यांनी भारताने बांगलादेशच्या विद्यार्थी आंदोलनाला विरोध केला, ज्यामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा द्यावा लागला असे म्हटले. तसेच त्यांना आश्रय दिल्यामुळेच भारत आणि बांगलादेशचे संबंध बिघडले असल्याचे त्यांनी म्हटले.
मोहम्मह युनूस यांनी भारतीय माध्यमांवर कोणते आरोप केले?
युनूस यांनी भारतीय माध्यांवर विद्यार्थी आंदोलन इस्लामिक कट्टरवादाशी जोडल्याचे आणि बांगलादेशला तालिबानसारखे दाखवले असल्याचा आरोप केला आहे.
भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर मोहम्मद युनूस यांनी काय टीका केली?
युनूस यांनी अनेक वेळा भारताच्या ईशान्येकडील राज्यावर टीका केली आहे. यावर पुन्हा टीका करत त्यांनी भारताच्या सात ईशान्य राज्यांना समुद्रमार्ग नाही, तर बांगलादेशने त्यांना मार्ग उपलब्ध करुन दिला आहे, असे म्हटले आहे.