Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Eelection : बांगलादेशच्या निवडणुकीवर दुनियेचा डोळा; EU आणि ब्रिटन करणार आंतरराष्ट्रीय निरीक्षण

Bangladesh Election : बांगलादेशात २०२६ मध्ये फेब्रुवारीत सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. परंतु बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता पाहता पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्न उभारले आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 30, 2025 | 06:43 PM
Bangladesh election EU to send 150 observers

Bangladesh election EU to send 150 observers

Follow Us
Close
Follow Us:

Bangladesh Eelection : ढाका : सध्या बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्याचे अंतरिम सरकार आणि मीज पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षामध्ये वाद सुरु आहे. येत्या सार्वत्रिक निवडणूकांवरुन हा वाद रंगला आहे. बांगलादेशमध्ये (Bangladesh) फ्रेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे. याच वेळी ब्रिटनने बांगलदेशाला मदतीची घोषणा केली आहे.

EU कडून बांगलादेशला त्रिपक्षीय करार सादर

ब्रिटन आणि युरोपियन यूनियन (EU) या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील निवडणूका पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पाडण्यासाठी युरोपियन यूनियन यासाठी १५० निवडणूक निरीक्षक पाठवणार आहे. या संदर्भात युरोपियन युनियनने बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालय व निवडणूक आयोगाला त्रिपक्षीय करारचा (MOU) प्रस्ताव पाठवला आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार! आदिवासी विद्यार्थिनीवरील अत्याचारानंतर तीव्र संघर्ष; 3 ठार, अनेक जखमी

युरोपियन युनियनची बांगलादेश आयोगाला भेट

बांगलादेशच्या निवडणूक आयोगाचे वरिष्ठ सचिव अख्तर अहमद यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, युरोपियन युनियनचे प्रतिनिधी मंडळाने बांगलादेश आयोगाला भेट दिली आहे. यासाठी EU मतदान केंद्रामध्ये निरीक्षण करणार आहे. निकाल जाहीर करण्याची पद्धत, गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्धी या सर्वांची तपासणी केली जाणार आहे. याची माहिती बांगलादेश आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. सर्व निवडणूक परीक्षक निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर बांगलादेशात निरिक्षणासाठी दाखल होणार आहेत.

ब्रिटनही निभावणार बांगलादेश निवडणूकीत महत्त्वपूर्ण भूमिका

बांगलादेशच्या निवडणूक प्रक्रियेत ब्रिटनही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ढाकातील ब्रिटनच्या उच्चायुक्त सारा कुक यांनी मुख्य निवडणूक आयुक्त एएमएम नसीर उद्दीन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ब्रिटनच्या सहकार्याबाबत चर्चा झाली. ब्रिटनने देखील बांगलादेशातील निवडणूका पारदर्शकतेने पार पडाव्यात यासाठी मदतीची ऑफर दिली.

ब्रिटनचे एक प्रतिनिधी मंडळ यासाठी बांगलादेशला प्रशिक्षण देणार आहे. याशिवाय ब्रिटन आणि इतर काही आंतरराष्ट्रीय संघटना राष्ट्रीय नागरी शिक्षण कार्यक्रम व निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत.

युरोप आणि ब्रिटनकडून बांगलादेशला मिळणारे सहकार्य महत्त्वाचे मानले जात आहे. कारण गेल्या काही वर्षात बांगलादेशमधील परिस्थिती पाहता त्यांच्या निवडणुकांबाबत निष्पक्षतेवर प्रश्न उभे राहिले आहेत. बांगलादेशातील निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे संपूर्म जगाचे लक्ष याकडे लागलेले आहे.

 FAQs (संबंधित प्रश्न)

प्रश्न १. बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूका कधी होणार आहेत? 

बांगलादेशात फ्रेब्रुवारी २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणूका होणार आहेत.

प्रश्न २. युरोपियन युनियन बांगलादेशात किती निवडणूक निरीक्षक पाठवणार आहेत?

युरोपियन युनियन बांगलादेशात १५० निवडणूक निरीक्षक पाठवणार आहेत.

प्रश्न ३. ब्रिटन बांगलादेशला निवडणूकींमध्ये कसे सहकार्य करणार आहे? 

ब्रिटन बांगलादेशला पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणूकां घेण्यासाठी मदत करणार आहे. यासाठी ब्रिटनचे एक प्रतिनिधी मंडळ बांगलादेशमध्ये नागरी शिक्षण कार्यक्रम व निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही देणार आहेत.

‘ते आम्हाला तालिबानसारखे दाखवत आहेत’ ; मोहम्मद युनूस यांचे भारतावर गंभीर आरोप

Web Title: World news bangladesh election eu to send 150 observers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 06:43 PM

Topics:  

  • Bangladesh
  • World news

संबंधित बातम्या

इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला ‘मास्टरप्लॅन’
1

इराणमध्ये अजूनही अडकले हजारो भारतीय; कशी होणार सुटका? परराष्ट्र मंत्रालयाने सांगितला ‘मास्टरप्लॅन’

Middle East Conflict : आधी मुनीर आता शाहबाज शरीफ… सौदीमध्ये नेमकं शिजतंय काय? इराणविरोधात मैदानात उतरणार पाकिस्तान?
2

Middle East Conflict : आधी मुनीर आता शाहबाज शरीफ… सौदीमध्ये नेमकं शिजतंय काय? इराणविरोधात मैदानात उतरणार पाकिस्तान?

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी
3

Iran Leadership : इराणचा नवा वारसदार संकटात! मोजतबा खामेनेई हल्ल्यात जखमी; गुप्त स्थानी सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांकडून पुष्टी

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल
4

Global Oil Crisis : भारताला दिलासा, पण अनेक देश अजूनही तेल संकटात; जाणून घ्या इस्रायल-अमेरिकेचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.