Bangladesh Voilence 3 killed in tribal and bengali clashesh over abduction of school girl
Bangladesh News in marathi : ढाका : बांगलादेश (Bangladesh) पुन्हा एकदा हिंसाचाराचे वातावरण निर्माण झाले आहे. बांगलादेशच्या दक्षिण पूर्वेकडील आदिवासी बहुल खागराचरी जिल्ह्यात रविवारी (२८ सप्टेंबर) तीव्र संघर्ष झाला. या संघर्षात ३ जण ठार झाले अनेक आदिवासी लोक जखमी झाले आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. सध्या सुरक्षाबंदोबस्त कडक करण्यात आला आहे.
बांगलादेश गृहमंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी करत सांगितले की, या हल्ल्यात ३ आदिवांसीचा बळी गेला आहे, तर अनेक जखमी झाले आहेत. तसेच एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह ३ सैनिक, ४ पोलिस आणि काही नागरिक जखमी झाले आहेत. परिस्थिती बिकट झाली असून त्यावर नियंत्रणासाठी पोलिस दल व लष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
आधी बेदम मारहाण, मग बोटे कापली अन्….; अर्जेंटिनात तीन तरुणींची हत्या थेट इंस्टाग्रामवर लाईव्ह
गुईमारा उप-जिल्ह्यात ही घटना घडली असून एका आदिवासी मुलीवरील कथित सामूहिक लैंगिक अत्याचारानंतर तीव्र आंदोलन पेटले होते. जम्मू-स्टुडंट्स नावाच्या संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरु केले होते. यावेळी बंगाली आणि आदिवासी लोकांमध्ये झटापट झाली. यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. परिणामी सरकारने १४४ कलम लागू करत जमावबंदी केली. पण यामुळे संघर्ष अधिक उफळला.
Conflict spreads in tribal-dominated hilly region of Bangladesh, 3 killed Read @ANI Story |https://t.co/FFYOdQqmoK#Bangladesh #violence #tribals pic.twitter.com/CKAXpFsyPm — ANI Digital (@ani_digital) September 29, 2025
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ट्युशनवरुन घरी जात असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आला. रात्री उशिरा अर्धमृत अवस्थेत ती सापडली. याची माहिती मिळताच तिला तातडीने पालकांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेच्या तपासाअंतर्गत एका संशयित अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. सध्या त्याला सहा दिवसांच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या घटने संदर्भात इतर चौकशीही सुरु आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. आंदोलने थांबवण्यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या सभा आणि रॅलींवर बंदी घातली आहे. परंतु आदिवासी आणि बंगाली समुदायात तीव्र राग उफाळत असून हिंसाचार थांबवण्याचे नाव घेईना. बांगलादेशच्या गृह मंत्रालयाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून दोषींवर कठोर कारवाई होईल असे म्हटले आहे. तसेच मंत्रालयाने सर्व समुदायांना शांतात व संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.या घटनेने पुन्हा एकदा बांगलादेशातील अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
बांगलादेशात हिंसाचार (Bangladesh Violence) का उफाळला?
बांगलादेशात एका आदिवसी मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचारानंतर तीव्र आंदोलन झाले. पीडितेवरील अत्याचाराचा तीव्र विरोध झाला. यामुळे बांगलादेशात हिंसाचाप उफळाला आहे.
बांगलादेशात कोणत्या समुदायात सुरु आहे हिंसाचार?
बांगलादेशात आदिवासी समुदाय आणि बंगाली समुदायात हिंसाचारा उफाळला आहे.
हिंसाचारात किती जीवीतहानी झाली?
बांगलादेशच्या गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आदिवासी आणि बंगाली समुदायात झालेल्या हिंसाचारात, ३ आदिवासी ठार झाले आहेत, तर अनेक जखमी झाले आहेत. तसेच पोलिस आणि सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसह १६ जण जखमी झाले आहेत.
आणखी एका देशात नेपाळसारखी परिस्थिती; सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधी Gen Z तरुण उतरले रस्त्यावर