सोशल मीडियावर एक एआय व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये महाभारतातील काही प्रसिद्ध शस्त्रे दाखवण्यात आली आहेत. यात भगवान श्रीकृष्णाच्या बासुरी, धर्मराज युधिष्ठिराचा भाला, अर्जुनाचा धनुष्यबाण अशी अनेक शस्त्रे यात दाखवण्यात आली आहे. यातील दृश्ये फारच अद्भुत असून लोक आता या फोटोजच्या प्रेमात पडली आहेत.
श्रीकृष्णाची बासुरी, युधिष्ठिराचा भाला, कर्णाचे कवचकुंडल अन् द्रौपदीचा अक्षय पात्र; AI ने तयार केले भन्नाट फोटो
व्हायरल व्हिडिओमध्ये भगवान श्रीकृष्णाची बासुरी दाखवण्यात आली आहे, जिला प्रेम, शांती आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते. यामध्ये भगवान श्रीकृष्णाची कौमोदकी गदा देखील दाखवण्यात आली होती, जी खरोखरच खूपच सुंदर दिसत आहे
या फोटोमध्ये श्रीकृष्णाचा प्रसिद्ध शंख 'पंचजन्य' देखील दाखवण्यात आला आहे, जो महाभारतातील युद्धाच्या सुरुवातीला वाजवण्यात आला होता.तसेच यात धर्मराज युधिष्ठिराच्या भाल्यालाही दाखवण्यात आले आहे, जे सत्य आणि धर्माचे प्रतीक मानले जाते
महाभारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रांपैकी एक, अर्जुनाचे धनुष्य देखील एआयद्वारे बनवण्यात आले आहे, हे शौर्याचे प्रतीक आहे. यात अर्जुनाचा तेजस्वी मुकुट देखील दर्शविला आहे, जो त्याच्या भव्य आणि योद्धा स्वरूपाचे सूचक आहे
एआयने कर्णाचा धनुष आणि त्याला जन्मजात मिळालेल्या कवचकुंडलांनाही अद्भुतरित्या तयार केले आहे, जे पुढे इंद्राला दान केले होते. हे अमरत्वाचे प्रतीक आहे
पराक्रमी भीमाची गदा देखील भव्यपणे दाखवण्यात आली आहे. हे शक्ती, क्रोध आणि धैर्याचे प्रतीक आहे. एवढेच काय तर यात द्रौपदीचा अक्षय पात्र देखील दाखवण्यात आला आहे. द्रौपदीला हे पात्र भगवान सूर्याकडून प्राप्त झाले होते, हे एक असे भांडे होते ज्यामध्ये अन्न कधीही संपत नव्हते