Jaykumar Gore on Pandharpur Kartiki Yatra
पंढरपुरात एका कार्यक्रमानिमित्त आले असता पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आषाढी यात्रेच्या काळात शहरात स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर कार्तिकी यात्रेतही सर्व व्यवस्था करण्यात येणार आहेत. यासंदर्भात प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील. कार्तिकी यात्रेच्या नियोजनासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन सर्व विभागांचा आढावा घेतला जाईल. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे गोरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आ. रोहित पवार यांच्याकडून होत असलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, ‘मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. सोन्याचा चमचा घेऊन किंवा कुणाच्या आजोबांच्या नावावर राजकारणात आलेलो नाही. कष्टाच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे चार वेळा आमदार झालो आहे. मलाही सर्वांची सर्व माहिती आहे. मात्र, मला तोंड उघडायला लावू नका. आज दिवाळीचा सण असल्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही.’
गोरे यांच्या या वक्तव्यामुळे रोहित पवार यांच्या टीकेला त्यांनी सूचक प्रत्युत्तर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कार्तिकी यात्रेच्या नियोजनासाठी पंढरपुरात आलेल्या पालकमंत्र्यांच्या विकासकामांसोबतच या राजकीय विधानाचीही चर्चा रंगली आहे.
‘मी कडुलिंबासारखे गुणकारी औषध आहे. माझ्या सानिध्यात जे येतील, ते चांगलेच वागतील. कडुलिंब कडू असला तरी सर्व रोग बरे करतो. आमदार समाधानदादा, तुम्ही पण माझ्यासाठी या कडुलिंबाचा काढा प्या, म्हणजे पोट कमी होईल,’ असा मिश्किल टोला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार समाधान आवताडे यांना लगावला. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.
Ans: आषाढी यात्रेच्या धर्तीवर कार्तिकी यात्रेचे नियोजन करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
Ans: शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्ती, चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता आणि ६५ एकर भक्तिसागर परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे.
Ans: चंद्रभागा नदी परिसराची स्वच्छता करून भाविकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.






