Ajit Pawar Death : काका-पुतणा-बहीण-पत्नीही आहे राजकारणात... किती मोठं आहे अजित पवारांचं कुटुंब?
अजित पवार यांनी १९८० च्या दशकात राजकारणात प्रवेश केला. आतापर्यंत त्यांनी तब्बल सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद पटकावले आहे. त्यांचा जन्म जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला.
अजित पवारांच्या वडिलांचे नाव अनंतराव पवार तर आईचे नाव आशाताई पवार असे आहे.
अजित पवार हे शरद पवार यांच्या धाकट्या भावाचे पुत्र आहेत. शरद पवार यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या चुलत बहीण. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या १७ व्या लोकसभेतील खासदार आहेत.
कुटुंबात जोडलं जाणारं आणखीन एक नाव म्हणजे रोहित पवार. हे अजित पवारांचे पुतणे असून राजकारणात काका-पुतण्याची जोडी चर्चेत होती.
अजित पवार आणि रोहित पवार यांच्या जोडीलाच शरद पवार आणि पार्थ पवार या काका-पुतण्याची जोडीही फार चर्चेत असते. पार्थ पवार हे देखील भारतीय राजकारणी असून ते अजित पवारांचे धाकटे सुपुत्र आहेत.
शरद पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार देखील राजकारणात असून त्या सध्या महाराष्ट्रातून राज्यसभेच्या खासदार आहेत. यासोबतच त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) सदस्य आहेत