Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचे अपघाती निधन; शरद पवार दिल्लीवरुन तातडीने रवाना

Ajit Pawar Passed Away : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचे काका राज्यसभा खासदार शरद पवार हे दिल्लीवरुन रवाना झाले आहेत. ते तातडीने विमानतळावर दाखल झाले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 28, 2026 | 11:22 AM
'महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते'; 'या' नेत्याने केला मोठा दावा

'महापालिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ असे अजितदादा म्हणाले होते'; 'या' नेत्याने केला मोठा दावा

Follow Us
Close
Follow Us:

Ajit Pawar Passed Away : बारामती : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे आज एका विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. राज्यातील इतका मोठा नेता गमावणे म्हणजे महाराष्ट्रासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. राजकीय वर्तुळात ही अत्यंत दुःखद बातमी असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांचे काका राज्यसभा खासदार शरद पवार (Sharad Pawar) हे दिल्लीवरुन रवाना झाले आहेत.

खासदार शरद पवार हे राजधानी दिल्लीमध्ये होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमानाच्या अपघातामध्ये निधन झाल्याची वार्ता कळताच शरद पवार हे दिल्लीवरुन बारामतीला रवाना झाले आहेत. शरद पवार हे दिल्लीवरुन विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी शरद पवार यांच्या चेहऱ्यावर अतोनात दुःख दिसून येत होते.

हे देखील वाचा : Ajit Pawar Passed Away : दिलदार नेता हरपला…! सर्वच राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

दिल्लीमध्ये संसदीय बजेट अधिवेशन सुरु होणार होते. यामुळे अनेक खासदार हे दिल्लीमध्ये होते. राज्यसभा खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील दिल्लीमध्ये होत्या. मृत्यूची बातमी कळाल्यानंतर सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या तातडीने महाराष्ट्राकडे येण्यासाठी रवाना झाल्या आहेत. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या विमानतळावरुन निघाल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या व्यतिरिक्त, विमानात त्यांचे सुरक्षा रक्षक, एक सहाय्यक आणि दोन क्रू मेंबर्स (एक पायलट आणि एक सह-पायलट) होते. सुरुवातीच्या वृत्तानुसार, विमानाने धावपट्टीवर उतरण्याचा प्रयत्न केला परंतु ते दिशा बदलली. त्यानंतर विमानाला आग लागली आणि ते पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झाले. अपघाताचे व्हिडिओ देखील समोर येत आहेत, ज्यामध्ये घटनास्थळी विखुरलेले ढिगारे आणि जमिनीवरून धूर निघत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित

अजित पवारांच्या मृत्यूवर खासदार संजय राऊत म्हणाले, “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, हे बेचव आणि अळणी होईल. कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा, रोखठोक, दिलखुलास असे अजित पवारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज राज्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे.” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

 

Web Title: Sharad pawar leaves delhi for baramati after ajit pawar accidental death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar news
  • ajit pawar plane crash
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!
1

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित
2

Baramati Plane Crash Breaking: बारामतीत पुन्हा विमान अपघात;सुदैवाने वैमानिक सुरक्षित

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण
3

Maharashtra Politics: राजकारणात मोठी खळबळ! सुनील तटकरे थेट ‘सिल्व्हर ओक’वर; शरद पवारांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान
4

Sharad Pawar News: देशाच्या अर्थव्यवस्थेवर..; पंतप्रधान मोदींच्या त्या आवाहनानंतर शरद पवारांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.