Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. कांजीवरम साडीतील तिने फोटो शेअर केले असून तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड घायाळ करतोय. गजरा, साडी आणि पारंपरिक लुकला दिलेला एक वेगळा अंदाज सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय. शिवालीचा हा लुक आपण करूया डिकोड (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
शिवाली परबने एक वेगळाच क्लासी लुक इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. लालचुटूक कांजीवरम साडीमध्ये तिचा हा पारंपरिक लुक खुलून आलाय

कुरळे केस सोडून त्यात मोठासा गजरा तिने माळला आहे आणि वेगळ्यात अदांनी तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

शिवालीने यासह खूपच सुंदर अशी टेंपल ज्वेलरी परिधान केली आहे. झुमके, बांगड्या आणि नेकलेस, कंबरपट्टा यासह परफेक्ट मॅच केले आहे. तर दाक्षिणात्य पद्धतीने तिने दोन्ही नाकपुड्यात Nosering घातली आहे

शिवालीचा हा लुक केसांच्या कुरळेपणाने अधिक आकर्षक झालाय. तर तिच्या पोझमुळे या अदांवर चारचाँद लागले आहेत

कपाळावर ठसठशीत लाल रंगाची टिकली लावली असून कांजीवरम साडीवर शोभेल असा मिनिमल मेकअप केला आहे

काजळ, लायनर, परफेक्ट ग्लिटर आयशॅडो कॉम्बिनेशन आणि फाऊंडेशन, कॉन्ट्यूर, पुसटशी लाल लिपस्टिक असा तिने आपला लुक पूर्ण केलाय






