Security Guard (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सध्या सगळ्यांचंच तेच म्हणणं आहे, महागाई वाढली, पगार पुरत नाही. 50 हजार कमावणारा पण म्हणतो, महिना कसा जातो कळत नाही. 1 लाख पगार असणारा पण म्हणतो, हातात काहीच राहत नाही. सेव्हिंग करायची कशी, खर्च कुठे कमी करायचा, हेच कळत नाही. परंतू अवघ्या 18 हजारांच्या नोकरीत एक सिक्योरुटी गार्ड आपलं घर कसं चालवतो? हे ऐकून तुमचीही पगाराकडे पाहण्याची नजर बदलेल. हे आपल्यालाही शक्य आहे, असं तुम्ही म्हणालं. खरंच, 18 हजारात घर चालवणं म्हणजे काय, हे त्या गार्डचा हिशेब बघितल्यावर कळेल.
महिन्याला 18 हजार रुपये पगार मिळत असेल तर घरखर्च भागवून किती पैसे शिल्लक राहतील? हा प्रश्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.अंकित पांडे नावाच्या एका माणसाने X वर एक पोस्ट टाकली. त्याने एका सिक्युरिटी गार्डशी Security Guard गप्पा मारल्या होत्या. त्या गार्डने त्याला आपल्या महिन्याचा पूर्ण हिशेब सांगितला. किती कमावतो, कुठे किती खर्च होतो, शेवटी हातात किती राहतात. अंकितने तो हिशेब जसाच्या तसा पोस्ट केला. आणि ती पोस्ट व्हायरल झाली. लोक म्हणायला लागले, यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतंय.
संबंधित सुरक्षा रक्षकाला दरमहा 18 हजार रुपये पगार मिळतो. मात्र घरभाडे, किराणा, मुलांचे शिक्षण आणि औषधांचा खर्च भागवल्यानंतर त्याच्या हातात केवळ दोन हजार रुपये उरतात. 18 हजार पगार त्यात घर चालवायचं, मुलं शिकवायची, घरभाडं द्यायचं. तरी तो माणूस महिन्याला 2 हजार रुपये वाचवतो. हे ऐकूनच अनेकांना धक्का बसला. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर कमी पगारात घर चालवणाऱ्या लोकांच्या अडचणींवर चर्चा सुरू झाली.
या सुरक्षा रक्षकाच्या महिन्याच्या खर्चात सर्वाधिक रक्कम अन्नधान्य आणि जेवणासाठी जाते. त्यासाठी दरमहा सहा हजार रुपये खर्च होतात. त्याच्या हिशेबात बघा. जेवणासाठी, किराण्यासाठी महिन्याला 6 हजार रुपये जातात. घरभाड्यासाठी 4 हजार रुपये जातात. म्हणजे फक्त या दोन गोष्टींवरच 10 हजार रुपये संपतात. पगाराच्या निम्म्याहून जास्त पैसा इथेच जातो.
याशिवाय मुलांच्या शाळेच्या फीसाठी 2 हजार रुपये जातात. मुलांना शिकवायचं पण आहे, घर पण चालवायचं आहे. या दोन्ही गोष्टी सांभाळताना पगाराचा मोठा भाग संपतो, हे या हिशेबातून दिसतंय.
व्यतिरिक्त प्रवासासाठी दरमहा दोन हजार रुपये खर्च होतात.कामावर जायला-यायला बसचं, ट्रेनचं भाडं लागतं. त्यासाठी महिन्याला 2 हजार रुपये जातात. घरातलं लाईट बिल आणि इतर बिलांसाठी 1 हजार रुपये जातात. आणि औषधांसाठी अजून 1 हजार रुपये जातात. घरात कोणी आजारी पडलं तर औषधं घ्यावीच लागतात.असा सगळा हिशेब केला तर त्याचा महिन्याचा खर्च 16 हजार रुपये होतो. 18 हजार पगारातून 16 हजार खर्च वजा केले तर हातात फक्त 2 हजार रुपये राहतात. म्हणजे कमाईच्या जवळपास 89 टक्के पैसा फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या गरजांवर खर्च होतो. चैन करायला, हॉटेलला जायला, फिरायला जायला पैसाच उरत नाही.
या पोस्टवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत.काही लोकांनी त्या गार्डचं कौतुक केलंय. म्हणाले, 18 हजारात पण 2 हजार वाचवतो, हेच खूप मोठं आहे. पण काही लोकांनी दुसरा प्रश्न विचारला. ही बचत किती दिवस टिकेल? घरात अचानक कोणी आजारी पडलं, मुलांच्या शाळेत जास्तीची फी मागितली, घरातला पंखा, टीव्ही बिघडला, तर हे 2 हजार लगेच संपून जातील. म्हणजे महिन्याच्या शेवटी पैसे उरले म्हणजे आपण सुरक्षित आहोत, असं नाही. ही चर्चा नेटकरी करतायत.
या पोस्टमुळे सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर आणि खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांसारख्या कमी वेतनावर काम करणाऱ्या वर्गाच्या आर्थिक अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये घरभाडे, प्रवास आणि शिक्षणाचा खर्च लक्षात घेता कमी उत्पन्नात बचत करणे आणखी कठीण ठरू शकते.
खरंच विचार करा. मुंबईत 4 हजारात खोली मिळणं पण अवघड आहे. पण तो माणूस 4 हजारात भाडं देतो, 6 हजारात घर चालवतो, मुलांना शिकवतो. आपण 50 हजार, 1 लाख कमावून पण महिना संपायच्या आधी खिसा रिकामा होतो, असं म्हणतो. फरक पगारात नाही, फरक हिशेब ठेवण्यात आहे.त्या गार्डकडे हिशेब आहे. कुठे किती जायचं, हे त्याला माहितीये. म्हणून तो 2 हजार वाचवू शकतो. आपण मात्र विनाकारण खर्च करतो. आणि मग पगार कमी आहे, असं म्हणतो.






