IND vs NZ: भारतासमोर धावांचे आव्हान (फोटो सौजन्य - X.com)
तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर चौथ्या सामन्यावर न्यूझीलंडने धावांचा डोंगर उभारून मजबूत पकड मिळवली आहे. आता भारताला जिंकण्यासाठी 334 धावा कराव्या लागणार आहेत.
न्यूझीलंडचे सलामीवीर टीम सायफर्ट आणि विल यंगने आज न्यूझीलंडच्या संघाची धुरा सांभाळली. विल यंगला दोन वेळा जीवनदान मिळाले आणि त्याने या संधीचे सोने केले. शतक झळकवत त्याने आपले काम पूर्ण केले. तर टीम सायफर्टनेदेखील दहा षटकांमध्ये ५० धावा काढत न्यूझीलंडला चांगली सुरूवात करून दिली. एका बाजूने विल यंगने बाजू लाऊन धरली आणि न्यूझीलंडला एक चांगला स्कोअर उभारून दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
India’s fielding lapses hand New Zealand early lifelines in 4th NZ vs IND 2026 ODI https://t.co/H02IeKq8wr — Cricket Hub (@Anurag9793) November 13, 2026
आकिब नबी न्यूझीलंडच्या डावातील दुसरे षटक टाकत होता. षटकाच्या पाचव्या चेंडूवर, चेंडू फलंदाज विल यंगच्या बॅटची कड घेऊन पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माकडे गेला. चेंडू चांगल्या उंचीवर होता आणि रोहितने तो सहज पकडला असता, पण चेंडू त्याच्या हातातून निसटला आणि त्याने झेल सोडला.
पुढच्याच चेंडूवर देखील विल यंगच्या बॅटची बाहेरील कड लागली आणि चेंडू स्लिप आणि यष्टीरक्षकाच्या मधून गेला. त्यानंतर इशान किशनने झेप घेऊन चेंडू पकडण्याचा शर्थीचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्याही हातातून निसटला. अशाप्रकारे, विल यंगला सलग दोन चेंडूंवर दोनदा जीवदान मिळाले.
आजच्या सामन्यात श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी रवाना झाला आहे. केएल राहुलही आजच्या सामन्यात खेळत नाहीये. श्रेयस अय्यरला कर्णधारपद देण्यात आले असून, ईशान किशन उपकर्णधार म्हणून काम पाहत आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीवरही बारकाईने लक्ष असेल. न्यूझीलंड संघातही अनेक बदल करण्यात आले आहेत.
Ans: भारत आणि न्यूझीलंडचा सामना बे ओव्हल इथे खेळविण्यात येत आहे
Ans: आज चौथा एकदिवसीय सामना खेळण्यात येत आहे
Ans: भारताला जिंकण्यासाठी ३३४ धावांची गरज आहे






