जगभरात प्रसिद्ध आहे रेशमी धाग्यांनी बनवलेली माहेश्वरी साडी!
बारीक नक्षीकाम करून तयार करण्यात आलेल्या साडीची डिझाइन माहेश्वर किल्ल्याच्या भिंतींवरून प्रेरित आहे. किल्ल्याच्या भितींवर कोरण्यात आलेल्या फूलांच्या, हिऱ्यांच्या आकृत्या, चटईचे डिझाइन माहेश्वरी साडीवर दिसून येतात.
पूर्वीच्या काळी गडद रांगांमध्ये माहेश्वरी साडी तयार केली जात होती. लाल, हिरवा, जांभळा, काळा इत्यादी रंगांसोबतच आता डाळिंबी, गुलबक्षी, अंगूरी, तपकीरी इत्यादी रंगसुद्धा माहेश्वरी साडीमध्ये दिसून आले आहेत.
माहेश्वरी साडीच्या पदरावर पट्टे किंवा चौकोनी डिझाइन करून अत्यंत साध्या पद्धतीमध्ये साडी बनवली जाते. साडीच्या काठावर चटईचे किंवा पानाफुलांची नक्षीकाम केले जाते.
माहेश्वरी साडीचा पदर अतिशय उठावदार आणि आकर्षक पद्धतीने तयार केला जातो. ही साडी विणण्यासाठी सोनेरी रंगाची जर वापरली जाते. ज्यामुळे साडीला अतिशय सुंदर लुक येतो.
माहेश्वरी साडीच्या पदरावर तीन रंगीत आणि दोन पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. ही साडी सुती आणि रेशमाच्या मिश्रणातून तयार केली जाते. हल्ली सर्वच महिलांच्या कपाटात एक तरी माहेश्वरी साडी नक्कीच दिसून येईल.