असं म्हणताात की मुलं असो की मुली त्यांची पहिली मैैत्रीण ही आईच असते. सिनेविश्वात देखील असे अनेक जण आहेत जे आई आणि मुलगा किंवा आई आणि मुलगी यांची जोडी लोकप्रिय आहे. आजच्या मातृदिनानिमित्ताने अशाच आई लेकाच्या जोडीबद्दल जाणून घेऊयात.

मृणाल कुलकर्णी आणि विराजस कुलकर्णी : सोनपरीचं मोहक हास्य असो किंवा स्वराज्यासाठी गनिमांशी दोन हात करणाऱ्या जिजामाता असो दोन्ही विरुद्ध व्यक्तिरेखा हुबेहुब हाताळणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. विरासजने माझा होशील ना या मालिकेतून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

ऋजुता देशमुख आणि साजिरी जोशी : ऋजुता देशमुख म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येते ती कळत नकळत मालिकेतील मधुरा. मालिकेला 20 वर्ष लोटली तरी अजुनही प्रेक्षकांच्या ही मालिका लक्षात आहे. अगदी जुळ्या बहिणी शोभाव्यात अशी आई लेकीची जोडी म्हणजे ऋजुता देशमुख आणि साजिरी जोशी. साजिरीने देखील आपल्या आईचे गुण हेरत कलावििश्वात आपली छाप सोडली. बाई तुझ्या पायी आणि एप्रिल मे 99 या वेबसिरिज आणि सिनेमातून साजिरीने देखील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे : मराठी सिनेविश्वातला चॉकलेट बॉय म्हणून अभिनय बेर्डेला ओळखलं जातं. बेर्डे घराण्याला कलेचा वारसा लाभलेला असल्याने अभिनयने देखील सिनेविश्वात करिअरला सुरुवात केली. प्रिया बेर्डे आणि अभिनय बेर्डे ही मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय आई लेकाची जोडी आहे.

किशोरी गोडबोले आणि सई गोडबोले : विनोदी अभिनेत्री म्हणून किशोरी गोडबोलेला ओळखलं जातं. माझाा नवरा तुझी बायको , खबरदार अशा अनेेक सिनेमातून तिने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेला. आईच्या पावलावर पाऊल टाकत तिची लेक सई गोडबोलेने देखील अभिनात आपला ठसा उमटवला. सई उत्तम अभिनेत्री तर आहेस पण त्याबरोबर ती उत्तम गायिका देखील आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे सई गोडबोले ही जगभरात नावाजलेल्या अॅप्पल कंपनीची ब्रॅन्डअॅम्बेसेटर देखील आहे.

निर्मिती सावंत आणि अभिनय सावंत : कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक या विनोदी मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे निर्मिती सावंत. मराठी सिनेविश्वातील कॉमेडी क्विन म्हणून निर्मिती सावंत यांना ओळखलं जातं. आईच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय सावंतने देखील आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. श्रीमंत दामोदर पंत या सिनेमातून अभिनय प्रेक्षकांच्या भेेटीस आला त्यानंतर त्याने काही छोट्याा मोठ्या मालिकेत देखील काम केलं.






