IPL 2025: 'Leave captain Hardik alone on the field, Mumbai Indians are not Rohit's team..' Ambati Rayudu's sharp reaction
मुंबईन इंडियन्स संघात हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा, अशा दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. तसेच त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट असे वेगवानगोलंदाजही आहेत.
पाच वेळा आयपीएल विजेतेपद विजेत्या मुंबईच्या संघात स्टार खेळाडूंचा भरणा असून देखील मुंबईला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्यांना ५ पैकी ४ सामन्यात परभवाचे तोंड पाहावे लागले आहे.
रोहित शर्मा हा एक चांगला खेळाडू मानला जातो. तरी देखील त्याला फिल्डिंगच्या वेळी संघाबाहेर बसवले जाते. रोहितचा अनुभव हार्दिकच्या कामी येऊ शकेल, असे मत माजी क्रिकेटर संजय बांगर यांनी व्यक्त केले होते.
या चर्चेत अंबाती रायुडूने देखील उडी घेतली आहे. त्याने बांगर यांच्या मताशी असहमती दर्शवत म्हटले की, "हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी करताना कुणाची गरज भासत असेल? असे मला वाटत नाही."
पुढे तो म्हणाला की, "कर्णधाराला मैदानात एकटं सोडून द्यायला हवं. हार्दिकला त्याचे निर्णय स्वत: त्याला घेऊ द्यावेत. गेल्या वर्षीप्रमाणे मुंबईच्या एकाच संघात जर १० जण कर्णधारासारखे वागले तर मग पुन्हा गोंधळ उडेल."
रायडू म्हटला, "रोहित हा भारतीय संघाचा कर्णधार असून भारताचा सामना सुरू असतो तेव्हा तो निर्णय घेत असतो. त्यामुळे आयपीएलच्यावेळी तसेच घडणार, हे सर्वांनी लक्षात घ्यावे."
तसेच तो म्हणाला की, "रोहित हा आता मुंबई इंडियन्सचा कप्तान नाहीये. हा संघ हार्दिक पांड्याचा असून त्यामुळे हार्दिकला हवे तसे निर्णय घेऊ द्यावेत. हार्दिकला जे योग्य वाटत असेल टे होऊ द्यावं" वाटतं तेच घडायला हवं,असं अंबती रायुडू म्हणाला आहे.