महाराष्ट्रातील किल्ला आहे भारताचा सर्वात शापित किल्ला! आजवर कुणीही याला काबीज करू शकलं नाही; 350 वर्षांपासूनचे रहस्य...
असे म्हणतात की, ३५ वर्षांत या किल्ल्यावर अनेक सैन्यांनी हल्ले केले, ज्यात पार्तुगीज, ब्रिटीश, मुघल आणि मराठ्यांचा समावेश आहे मात्र अनेक हल्ल्यांनंतरही हा किल्ला कुणीही जिंकू शकला नाही
मुरुड जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा इतक्या अनोख्या प्रकारे बांधण्यात आला आहे की किल्लयापासून काही मीटर दूर जाताच हा दरवाजा पूर्णपणे बंद होतो आणि भिंतींमध्ये जाऊन लपतो. यामुळे अनेक शत्रू गोंधळात पडायचे
हा किल्ला तब्बल २२ एकरांवर पसरलेला आहे. यामध्ये एकूण २२ सुरक्षा चाैक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाैकीवर अजूनही तोफा ठेवलेल्या आहेत. यावरुनच आपण त्याच्या सुरक्षेची कल्पना करु शकतो. या किल्ल्याचे बांधकाम मलिक अंबरने सुरु केले होते
किल्ल्यावर सिद्दीकी शासकानी बराच काळ राज्य केले, त्यांच्या वर्चस्वात असताना इथे अनेक जड तोफा बसवण्यात आल्या, ज्या आजही किल्ल्यात दिसून येतात
किल्ल्याभोवती असलेल्या ४० फूट उंज भिंतींमुळे किल्ल्याला भेदने कोणत्याही शत्रूला जमले नाही. समुद्राच्या लाटांसमोरही हा किल्ला आजवर तितक्याच खंबारतेने उभा आहे, यावरुन त्याच्या अभियांत्रिकीची ताकद आपल्याला समजते
मुरुड किल्ला फक्त त्याच्या इतिहासासाठी आणि ताकदीसाठी प्रचलित नाही तर त्याची रचना, गूढता आणि अजिंक्य प्रतिमेमुळेही जगातील अनेक आश्चर्यांपैकी एक मानला जातो. इथे आजही अनेक पर्यटक भेट देण्यासाठी जात असतात