जगभर प्रसिद्ध आहे नवाबांची चव! लखनौचे 'हे' अनोखे खाद्यपदार्थ नक्की करा ट्राय
लखनौमधील सगळ्यात फेमस असलेला पदार्थ निहारी कुलचा. निहारी हा मांसाहारी पदार्थ असून मटणपासून बनवला जातो. हा पदार्थ कुलचा किंवा रोटीसोबत अतिशय सुंदर लागतो.
शहरातील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित पदार्थांपैकी एक असलेला पदार्थ म्हणजे गलोटी कबाब. गलोटी कबाब तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता. हा पदार्थ पाहतच क्षणी तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटेल.
पुलाव आणि बुरानी हे लखनौमध्ये मिळणारा प्रसिद्ध पदार्थ आहे. हा पुलाव बनवण्यासाठी सुगंधी, सौम्य मसाल्यांचा वापर केला जातो. तसेच पुलावसोबत खाल्ली जाणारी बुरानी थंड असते.
खिमा आणि रुमाली रोटी हे कॉम्बिनेशन अतिशय सुंदर लागते. चिकन किंवा मटणचा वापर करून तुम्ही खिमा बनवू शकता. खिमा बनवताना त्यात हिरवे वाटणे सुद्धा टाकले जातात.
थंडगार कुल्फी फालुदा खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम आणि शेवया टाकल्या जातात. कुल्फी फालुदा हा लखनौमधील प्रसिद्ध पदार्थ आहे.