Neha Pendse Brown Silk Saree (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
नेहाचा रॉयल अंदाज: मराठी आणि हिंदी दोन्हीकडे गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. तिचं सौंदर्य आणि अभिनय दोन्ही भारी आहे. नेहा फक्त अभिनयातच नाही तर फॅशनमध्ये पण एक नंबर आहे. तिच्या या नव्या फोटोत ती ब्राऊन कलरच्या सिल्क साडीत दिसतेय. या साडीत तिचा लूक एकदम रॉयल आणि क्लासी वाटतोय. फोटो बघूनच चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडलाय. (फोटो सौजन्य :- @nehhapendse)
डीपनेक ब्लाऊजचा ग्लॅमरस टच: या लुकमध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे ती तिच्या ब्लाऊजची. नेहाने या पारंपरिक साडीसोबत एकदम मॉडर्न डीपनेक ब्लाऊज घातलाय. साडी ट्रेडिशनल आणि ब्लाऊज बोल्ड, यामुळे तिचा लूक एकदम हटके झालाय. आजकाल मुलींना असाच पॅटर्न खूप आवडतोय. डीपनेक, बॅकलेस, स्लीव्हलेस ब्लाऊजची सध्या जबरदस्त क्रेझ आहे आणि नेहाने तोच ट्रेंड फॉलो केलाय.
ब्राऊन सिल्क साडीचा रुबाबच वेगळा: नेहाने निवडलेली ब्राऊन सिल्क साडी साधी दिसत असली तरी तिचा रुबाबच वेगळा आहे. सिल्क साडी नेसली की आपोआप व्यक्तिमत्व उठून दिसतं. ब्राऊन रंग हा नेहमीच श्रीमंती आणि एलिगंट लुक देतो. जास्त डिझाईन नसतानाही फक्त रंग आणि कपड्यामुळे साडी एकदम महागडी वाटतेय. साधेपणात पण सौंदर्य असतं याचं हे उत्तम उदाहरण आहे.
मेकअप एकदम साधा आणि सुंदर: साडी भारी असेल तर मेकअप साधाच ठेवायचा, हाच नियम नेहाने पाळलाय. तिने ब्राऊन साडीवर न्यूड आणि पीच शेडचा मेकअप केलाय. डोळ्यांना काजळ आणि आयलायनरने उठाव दिलाय आणि ओठांसाठी सॉफ्ट ब्राऊन लिपस्टिक लावली आहे. जड मेकअप न करता तिने आपला लूक एकदम फ्रेश आणि नैसर्गिक ठेवलाय, जो खूपच सुंदर दिसतोय.
ट्रेडिशनल + मॉडर्नचा परफेक्ट मेळ: नेहाचा हा लूक का आवडतोय माहिती आहे का? कारण तिने जुनं आणि नवीन दोन्ही एकत्र आणलंय. साडी पूर्णपणे पारंपरिक आहे पण ब्लाऊज एकदम मॉडर्न. आजकाल हाच ट्रेंड आहे. फक्त साडी नेसून नाही तर तिला स्टायलिश ब्लाऊजची जोड दिली की लूक एकदम बदलतो. रंग साधा असला तरी ब्लाऊजमुळे सगळा फोकस तिच्यावर जातोय.
दागिन्यांची योग्य निवड: साडीवर दागिने काय घालायचे हे पण खूप महत्वाचं असतं. नेहाने इथे खूप जड दागिने नाही घातले. सिल्क साडीवर सोनेरी आणि नाजूक दागिने जास्त उठून दिसतात. तिने कानातले आणि बांगड्या अशा मोजक्या गोष्टी घातल्या आहेत. साडी आणि ब्लाऊज आधीच बोल्ड असेल तर दागिने कमीच घालायचे, हाच तिच्या लुकचा प्लस पॉइंट आहे.