Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uber New Safety Feature: कॅबमधील वादांना बसणार ब्रेक! Uber ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणलं खास फीचर

Uber New Safety Feature: कॅब प्रवासातील गैरवर्तन, भाड्यावरून होणारे वाद आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर उपाय म्हणून Uber ने 'Record My Trip' हे नवीन सेफ्टी फीचर लॉन्च केले आहे. या फीचरच्या मदतीने प्रवासादरम्यान व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 01, 2026 | 04:37 PM
Uber New Safety Feature: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Uber New Safety Feature: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Uber चे ‘Record My Trip’ सेफ्टी फीचर लॉन्च
  • कॅबमधील व्हिडिओ आणि ऑडिओ होणार रेकॉर्ड
  • अधिकृत तपासासाठीच फुटेज उपलब्ध होणार

ॲपवरून कॅब बुक करायची म्हटलं की लोकांना टेन्शन येतं. कधी भाड्यावरून भांडण, कधी ड्रायव्हरचं वागणं खराब, कधी तर गंभीर घटना घडतात. या सगळ्या गोंधळाला कंटाळून उबरने आता एक भारी पाऊल उचललंय. कंपनीने ‘रेकॉर्ड माय ट्रिप’ नावाचं नवीन सेफ्टी फिचर लाँच केलं आहे. Uber New Safety Feature:

आता तुम्ही कॅबमध्ये बसल्यापासून उतरेपर्यंत सगळा प्रवास रेकॉर्ड होणार आहे. अलीकडे झालेल्या काही वाईट घटनांनंतर उबरला हा निर्णय घ्यावा लागला आहे. यामुळे जो कोणी नियम तोडेल, चुकीचं वागेल, त्याच्यावर लगेच कारवाई करणं सोपं होणार आहे.

हे ‘रेकॉर्ड माय ट्रिप’ कसं काम करणार?

उबर इंडियाने सांगितलं की, या फिचरचा उद्देश एकच आहे, प्रवासात काही वाईट घडलं तर त्याची चौकशी व्यवस्थित व्हावी. कॅबमधला व्हिडीओ आणि आवाज दोन्ही रेकॉर्ड होणार आहे, पण ते पूर्णपणे एनक्रिप्टेड असणार आहे.

म्हणजे काय?

म्हणजे प्रवास चालू असताना किंवा नंतर ड्रायव्हर, तुम्ही किंवा स्वतः उबर कंपनी पण ते फुटेज थेट बघू शकणार नाही. ते फुटेज लॉक राहील.मग बघणार कोण? जर प्रवासात काही भांडण झालं, काही चुकीची घटना घडली, तर पोलीस किंवा कायदेशीर तपास करणारी यंत्रणा अधिकृतपणे मागणी करून ते फुटेज घेऊ शकेल. त्यामुळे पुरावा म्हणून ते कामाला येईल.

एवढंच नाही तर प्रवाशांना पण त्यांच्या ॲपवरून स्वतः रेकॉर्डिंग चालू करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. यामुळे उबरच्या प्रवासात पारदर्शकता येईल आणि चुकीचं वागणाऱ्यांना वचक बसेल.

भाड्यावरून वाद आणि जीवे मारण्याची धमकी, काय घडलं होतं?

गुरुग्राममध्ये एक खूप वाईट घटना घडली होती, त्यानंतरच हे सगळं जास्त चर्चेत आलं. दिल्ली एअरपोर्टवरून एक सॉफ्टवेअर इंजिनिअर महिला गुरुग्रामला घरी जात होती. तिने उबर बुक केली. ॲपवर भाडं 625 रुपये दाखवत होतं.

पण घरी पोहोचल्यावर ड्रायव्हरने दुसरं ॲप दाखवून 1,479 रुपये मागितले. महिलेने जास्त पैसे द्यायला नकार दिला, तर ड्रायव्हरने तिचं सामान गाडीतच अडकवून ठेवलं. तिला शिव्या दिल्या आणि घरापर्यंत तिचा पाठलाग करून जीवे मारण्याची धमकी पण दिली.

या प्रकरणात पोलिसांनी केस नोंदवून यासिर नावाच्या 24 वर्षाच्या ड्रायव्हरला अटक केली. तो बनावट नावाने अकाउंट चालवत होता. उबरने पण त्याला कायमचं काढून टाकलं.

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत

ड्रायव्हरच्या खोट्या ओळखीचा मोठा प्रॉब्लेम

नोएडा आणि इतर शहरात पण असाच प्रॉब्लेम येतोय. ॲपवर नाव वेगळं दिसतं आणि गाडी चालवणारा माणूस वेगळाच असतो. लायसन्सवर नाव वेगळं, ॲपवर वेगळं. याच कारणामुळे दिल्ली हायकोर्टात एक याचिका टाकली गेली आहे.कोर्टाने कंपन्यांना आणि सरकारला सांगितलंय की, ड्रायव्हरची पूर्ण चौकशी करा, ॲपवर त्याची खरी ओळख दाखवा, गाडी कुठे चालली आहे ते ट्रॅक करा आणि SOS बटण दाबल्यावर लगेच मदत करा, हे सगळं सक्तीचं करा.

Cheapest Adas Cars In India: फक्त मायलेज नाही, सेफ्टी पण महत्वाची! 12 लाखाच्या आत ADAS असणाऱ्या 4 जबरदस्त गाड्या, जीव वाचवतील

ड्रायव्हरसाठी कमाईचे नवीन मार्ग

फक्त सेफ्टीच नाही, तर उबरने ड्रायव्हरसाठी कमाईचे नवीन मार्ग पण काढले आहेत. आता ड्रायव्हर फक्त लोकांनाच नाही, तर पार्सल पण पोहोचवू शकतो, पाळीव प्राण्यांना घेऊन जाऊ शकतो आणि काही शहरात उबर बाईक पण चालवू शकतो.त्यांच्यासाठी ‘Earn First, Pay Later’ नावाचा पास आणलाय. म्हणजे आधी कमवा आणि नंतर पासचे पैसे भरा. त्यामुळे नवीन ड्रायव्हरना पण काम सुरू करायला सोपं जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Uber चे 'Record My Trip' फीचर काय आहे?

    Ans: हे Uber चे सेफ्टी फीचर असून, कॅब प्रवासादरम्यान व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करण्याची सुविधा देते.

  • Que: 'Record My Trip' फीचरचा उद्देश काय आहे?

    Ans: प्रवासादरम्यान गैरवर्तन किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची चौकशी करण्यासाठी पुरावा उपलब्ध करून देणे हा या फीचरचा उद्देश आहे.

  • Que: प्रवासी स्वतः रेकॉर्डिंग सुरू करू शकतात का?

    Ans: होय, प्रवाशांना Uber ॲपमधून स्वतः रेकॉर्डिंग सुरू करण्याचा पर्याय मिळणार आहे.

Web Title: Uber record my trip safety feature india cab passenger security rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • auto mobile news
  • automobile news
  • Marathi News
  • uber

संबंधित बातम्या

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत
1

JSW Combat SUV Launch in India: रेंज पाहून थक्क व्हाल! JSW च्या Combat SUV चं इंटिरिअर लॉन्चपूर्वीच चर्चेत

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर
2

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर

Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत
3

Nagpur News : सायबर फसवणुकीचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त; ८ आरोपी अटकेत

Farmers Water Protest: राज्यातील धरणांच्या पाण्याच्या साठ्याची परिस्थिती गंभीर; राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?
4

Farmers Water Protest: राज्यातील धरणांच्या पाण्याच्या साठ्याची परिस्थिती गंभीर; राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.