शरीराच्या 'या' अवयवनांवर चुकूनही काढू नका टॅटू
हातांची त्वचा अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्वचा निरोगी आणि कायम चमकदार लावण्यासाठी हातांवर नियमित बॉडी ऑइल आणि मॉइश्चरायझर लावले जाते. पण टॅटू काढल्यानंतर हातांची त्वचा कालांतराने काळवंडून जाते.
अनेकांना काखेमध्ये टॅटू काढण्याची आवडत असते. पण काखेत टॅटू काढणे अतिशय चुकीचे आहे. सतत घाम येणे किंवा सतत हात हलवल्यामुळे काखेतील त्वचेचे घर्षण होते.
हातांच्या कोपरांवर टॅटू काढू नये. चुकीच्या अवयवांवर काढलेला टॅटू आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते. टॅटू काढल्यामुळे हातांच्या कोपरांवर ताण येण्याची शक्यता असते.
पायांवर काढलेला टॅटू काही दिवसांमध्येच फिका पडून जातो. कारण सतत सॉक्स किंवा शूज घातल्यामुळे टॅटूचा रंग उडून जातो. त्यामुळे पायांवर टॅटू काढू नये.
तळहातांवरील त्वचा अतिशय नाजूक असते. या त्वचेवर टॅटू काढल्यास त्वचा लाल होणे, जखम होणे किंवा फंगल इन्फेशन होण्याची शक्यता असते.