पृथ्वीवर आहे नरकाचा दरवाजा; 55 वर्षांपासून अखंड जळतोय... आता पुन्हा चर्चेत
१९७१ मध्ये, तुर्कमेनिस्तान हा रशियाचा भाग होता. सोव्हिएत शास्त्रज्ञ नैसर्गिक वायूच्या शोधात भूमिगत खाेदकाम करत होते आणि याचवेळी चुकून खोदकाम वायूचे साठे असणाऱ्या ठिकाणी करण्यात आले
भूगर्भातील वायूने भरलेल्या भागात खोदकाम केल्याने जमीन कोसळली आणि तिथे एक मोठा खड्डा तयार झाला. शास्त्रज्ञांना भीती होती की या खड्ड्यातून विषारी वायू बाहेर पडू शकतात, ज्यामुळे त्याला आग लावण्यात आली. या आगीत वायूला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला
त्यावेळी वायूला जाळणे हा सर्वात जलद आणि उत्तम उपाय मानला गेला. परंतू, ही आग गेल्या पाच दशकांपासून जशीच्या तशी जळत आहे. यात मोठ्या प्रमाणात मिथेन आहे
त्यातच आता जवळजवळ ५० वर्षांनंतर तुर्कमेनगाझच्या सरकारी ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की खड्ड्यात अखंड तेवत असलेली ही आग आता अनेक पटींनी कमी झाली आहे
वाळवंटात असलेले हे नरकाचे दार एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे, जगभरातून लोक या जागेचा चमत्कार पाहण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. वाळवंटात धगधगणारी ही आग कमी झाली असली तरी अजून पूर्णपणे बंद झालेली नाही. आग कमी करण्यासाठी या खड्ड्याभोवती अनेक विहिरी खोदण्यात आल्या आहेत