आता पैसे घालवण्याची गरज नाही ; या घरगुती पदार्थांच्या मदतीने घरीच चमकवा चांदीचे पैंजण
काही घरगुती पदार्थांच्या वापराने घरीच अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने चांदीचे पैंजण चमकवता येऊ शकतात
लिंबू-मीठ: लिंबातील नैसर्गिक घटक चांदीला पाॅलिश करण्यासाठी प्रभावी ठरतात. यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस पिळून त्यात थोडे मीठ घाला आणि मिक्स करा. ही पेस्ट चांदीच्या पैंजणावर लावा आणि काहीवेळ तसेच राहू द्या. त्यानंतर पायाला मऊ कापडाने घासून स्वच्छ करा
ॲल्युमिनियम फॉइल: चांदीचे पैजण साफ करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइल देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घऊन त्यात थोडे मीठ घाला. त्यानंतर यात ॲल्युमिनियम फॉइलचे तुकडे आणि चांदीचे पैंजण बुडवून ठेवा. काही तासांनी हे पैंजण पाण्यातून बाहेर काढा आणि कापडाने पुसा
टूथपेस्ट: तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण तुम्ही घरातील टूथपेस्टच्या मदतीनेही तुमचे काळे पैजण स्वच्छ करु शकता. यासाठी एका मऊ कापडावर टूथपेस्ट लावा आणि मग या कापडाने तुमचे काळे पैंजण घासा
बेकिंग सोडा: स्वयंपाकघरातील बेकिंग सोडा पैजण साफ करण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात थोडासा बेकींग सोडा घाला आणि मिक्स करा. आता यात तुमचे पैंजण काहीवेळ भिजवून ठेवा आणि मग सुती कापडाने पैंजण पुसून घ्या